Maharashtra Politics : कुणाच्या तरी मागे लागून आपली भाषा बदलू नये; राजू पाटलांचा फडणवीसांना सल्ला

MLA Raju Patil : राज्याच्या राजकारणाचा स्तर ढासाळायला नको
Raju Patil
Raju PatilSarkarnama

Kalyan Dombvili News : सध्या सुरू असलेले फडतूस-काडतूसचे राजकारणाने पातळी सोडळी आहे. राजकारण या स्तरावर जायला नको आहे. आपण कोणाच्या मागे लागून आपली भाषा तशीच वापरायची याला काही अर्थ नाही, असे म्हणत कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कान टोचले.

शिवसेनेचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ठाणे येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 'राज्याला फडतूस गृहमंत्री लाभले आहेत' असे म्हणत टीका केली होती. त्याला उत्तर देताना फडणवीस यांनी 'फडतूस नाही काडतूस हू मै, झुकेगा नही घुसेगा' असा शाब्दिक टोला लगावला. दोघा माजी मुख्यमंत्र्यांचे हे बोलणे समाज माध्यमावर चांगलेच ट्रोल होत आहे. त्यातच आता आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनीही सध्याच्या सुरू असलेल्या राजकारणावर टीका केली. तसेच उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांना कुणाच्या तरी मागे लागून आपणी भाषा न बदलण्याचा सल्ला दिला.

Raju Patil
Congress News : ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर काँग्रेसने भूमिका बदलली? 'सत्याग्रह' यात्रेत असणार सावरकरांचे छायाचित्र

यावेळी आमदार पाटील म्हणाले, "लोकांच्या ज्या समस्या आहेत त्यांच्याकडेही थोडं लक्ष द्यायला पाहिजे. लोकांच्या समस्या आहेत त्या घेऊन रस्त्यावर उतरायला पाहिजे. सध्या जे सुरू असलेले राजकारणाने पातळी सोडली आहे. खालच्या पातळी राजकारण जायला नको. माजी मुख्यमंत्र्यांना अशी भाषा शोभत नाही."

Raju Patil
Patan Politics : शेतकऱ्यांची ससेहोलपट रोखण्यासाठी पाटण बाजार समिती ताकतीने लढणार : शंभूराज देसाई

मनसेने डोंबिवली (Dombvali) स्टेशन परिसर फेरीवालामुक्त केला आहे. फेरीवाल्यांची समस्या सुटणे, रिक्षांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये या प्रश्नावर पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी गुरुवारी आमदार पाटील हे कल्याण पालिका मुख्यालयात आले होते. यावेळी आरटीओ, रिक्षा युनियन, फेरीवाला संघटना पदाधिकारी उपस्थित होते.

याविषयी आमदार पाटील म्हणाले, "स्टेशन परिसरातील १५० मीटर परिसर खाली ठेवणे, चिमणी गल्ली येथी पार्किंग प्लाझा आहे, तेथे रिक्षा पार्किंगसाठी जागा देण्यात येईल. राथ रोडवर दोन ठिकाणी रिक्षा थांबा होईल तेथे मीटरप्रमाणे रिक्षा चालू होतील. एक महिन्यात फेरीवाला धोरण निश्चित केल जाईल. तोपर्यंत ज्यांचा सर्व्हे झाला आहे त्यांना १५० मीटर अंतर सोडून बसण्याची मुभा दिली जाईल, आदी प्रश्नांवर यावेळी चर्चा करण्यात आली. यास सकारात्मक प्रतिसाद असून नागरिकांनीही सहकार्य करावे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com