Patan Politics : शेतकऱ्यांची ससेहोलपट रोखण्यासाठी पाटण बाजार समिती ताकतीने लढणार : शंभूराज देसाई

Shambhuraj Desai पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीच्या अनुषंगाने आयोजित मतदार, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मेळाव्यात मंत्री देसाई बोलत होते.
Shambhuraj Desai in Patan Sabha
Shambhuraj Desai in Patan Sabhasarkarnama

Patan Market Committee : बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित जोपासले पाहिजे. परंतू पाटण बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना Farmers सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याऐवजी येथून राजकीय फायदा होण्यासाठी यंत्रणेचा वापर केला जात आहे. गेली अनेक वर्षे सत्ता असूनही संस्थेची कोणतीही प्रगती नाही. शेती मालाला बाजारपेठ उपलब्ध करुन दिली नसल्याने शेतकऱ्यांची ससेहोलपट होत आहे. त्यामुळे शेतकरी हितासाठी पाटण बाजार समितीची निवडणूक ताकदीने लढणार आहे, असे स्पष्ट मत राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई Shambhuraj Desai यांनी केले.

पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीच्या अनुषंगाने आयोजित मतदार, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मेळाव्यात मंत्री देसाई बोलत होते. यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई(दादा), मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, जयराज देसाई, अशोकराव पाटील, डॉ.दिलीपराव चव्हाण, शिवसेना जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार, जिल्हा परिषद सदस्य विजय पवार, शिवशाही सरपंच संघाचे अध्यक्ष विजय शिंदे, भरत साळूंखे, बबनराव शिंदे, पांडूरंग नलवडे व कार्यकर्ते उपस्थित होते.

शंभूराज देसाई म्हणाले, पाटण बाजार समितीच्या निवडणुकीसंदर्भात आज मेळावा घेण्याची वेळ का आली याचा विचार सर्वांनी करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील इतर बाजार समितीच्या कारभार बघितला तर पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांसाठी कोणत्याही योजनेची अंमलबजावणी करण्यात अपयश आले आहे.

Shambhuraj Desai in Patan Sabha
Patan : शंभूराज देसाई कार्यकर्त्यांना घडवताहेत विमान प्रवास....

मराठवाडयातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी शासना मार्फत असणाऱ्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केलेली बघायला मिळते. यामध्ये शेतकऱ्यांसाठी निवाऱ्याच्या सुविधेसह त्यांच्या शेतीमालाच्या विक्रीची चांगली व्यवस्था पहायला मिळते. परंतु पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला साधी बाजारपेठ उपलब्ध करुन देता आली नाही.

Shambhuraj Desai in Patan Sabha
Jawali NCP News: जावळीत वाढणार राष्ट्रवादीची ताकद; अमित कदम राष्ट्रवादीच्या वाटेवर

या शेतकऱ्याच्या संस्थेतून केवळ राजकीय फायदाच घेण्यासाठी यंत्रणेचा वापर केला आहे. बाजार समितीच्‍या निवडणुकीमध्ये आपण केवळ विरोधासाठी विरोध म्हणून नाही तर शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय घेण्यासाठी तसेच राज्यातील शिवसेना, भाजप युतीच्या सरकारच्या माध्यमातून शासनाच्या असणाऱ्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये परिवर्तन होणे गरजेचे आहे. सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकत्रित येऊन जबाबदारी घेऊन या बाजार समिती निवडणूकीत जिंकायचीच या हेतूने निवडणूकीच्या रिंगणात आता उतरुया.

Shambhuraj Desai in Patan Sabha
Satara News : सावरकर गौरव यात्रेत छत्रपतींच्या वारसांनी सहभागी होणे दुर्देवी...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com