खंडणीसाठीच क्रूझवर ड्रग्ज पार्टी : पंच प्रभाकर साईलच्या वकिलाचा खळबळजनक दावा

या प्रकरणात पंच म्हणून ज्या १० कागदांवर माझ्या सह्या घेतल्या, त्या मी माझ्या मर्जीने केलेल्या नाहीत. के. पी. गोसावीच्या सांगण्यावरून मी सर्व केले आहे
prabhakar sahil
prabhakar sahilSarkarnama

मुंबई : क्रूझवरील ड्रग्ज पार्टी ही खंडणीसाठीच आयोजित केली होती, असा दावा याच प्रकरणात पंच असलेल्या प्रभाकर साईल याच्या वकिलाने एनसीबी अधिकाऱ्यांकडे केला आहे. तसेच, या प्रकरणात पंच म्हणून ज्या १० कागदांवर माझ्या सह्या घेतल्या, त्या मी माझ्या मर्जीने केलेल्या नाहीत. के. पी. गोसावीच्या सांगण्यावरून मी सर्व केले आहे, असेही साईलने एनसीबी अधिकाऱ्यांना सांगितले आहे. दरम्यान, ड्रग्ज पार्टी प्रकरणात पूजा ददलानीला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावले आहे; मात्र तब्येत बरी नसल्याचे कारण सांगून पूजा ददलानी आजही हजर झाली नाही. (Drugs party on a cruise for ransom: Panch Prabhakar Sail's lawyer's sensational claim)

ड्रग्ज पार्टीच्या तपासावरून साईलने एनसीबी अधिकारी आणि के. पी. गोसावीबाबत यापूर्वी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. त्याबाबत माहिती देण्यासाठी तो आज वकिलांसह एनसीबी कार्यालयात हजर झाला होता. या प्रकरणात आर्यन खानला अडकवून शाहरुख खानकडून मोठी खंडणी उकळण्याची योजना होती. पण, किरण गोसावीने आर्यन खानसोबत घेतलेला सेल्फी व्हायरल झाल्याने प्रकरण बिघडले. आर्यन खानला अटक झाली, तेव्हा शाहरूख खानची मॅनेजर पूजा ददलानीला दूरध्वनी केला होता, असेही त्याच्या वकिलांनी एनसीबी अधिकाऱ्यांना सांगितले.

prabhakar sahil
पवारांना भेटताच एकनाथ शिंदे हंगामी मुख्यमंत्री झाल्याच्या चर्चा!

२५ कोटींच्या खंडणीसाठी कट

शाहरुख खानकडून २५ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात येणार होती. त्यातील ८ कोटी समीर वानखेडे आणि बाकीची रक्कम के. पी. गोसावी आणि त्याच्या साथीदारांना मिळणार होती. ५० लाखांचा पहिला व्यवहारही करण्यात आला होता. ते ५० लाख प्रभाकर साईलने गोसावीच्या सांगण्यावरुन घेतले, असे प्रभाकर साईलच्या वकिलांनी सांगितले.

prabhakar sahil
राष्ट्रवादीचे सूचक मौनाचे राजकारण अन्‌ हर्षवर्धन पाटलांची हॅट्‌ट्रीक!

पूजा ददलानी पुन्हा गैरहजर

क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावले आहे. मात्र, तब्येत बरी नसल्याचे कारण सांगून पूजा ददलानी आजही हजर झाली नाही. याआधीही मुंबई पोलिसांनी दोन वेळा पूजा ददलानीला चौकशीसाठी बोलावले होते. तेव्हाही तब्येत बरी नसल्याचे सांगत तिने येणे टाळले होते. आर्यन खानला अटक केल्यानंतर शाहरुख खानकडून खंडणी घेण्यासाठी पूजा ददलानीला फोन केल्याचा खुलासा याच प्रकरणातील पंच प्रभाकर साईलने केला आहे. त्यानंतर एनसीबी आणि मुंबई पोलिसांच्या एसआयटीने प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. यात आर्यन खानला अटक झालेल्या दिवशी पूजा ददलानी, किरण गोसावी, सॅम डिसूझा यांच्यात फोनवर अनेकदा बोलणे झाल्याचे मुंबई पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. त्याचीच पुढे चौकशी करण्यासाठी पूजा ददलानीला मुंबई पोलिसांनी समन्स पाठवले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com