मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) गटात सामील झालेले आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांना सक्तवसुली संचानलयाने (ईडी ED) दणका दिला आहे. सरनाईक यांची ११ कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्याचा निर्णय ईडीने आज घेतला आहे, त्यामुळे मोठ्या आशेने शिंदे गटात सामील झालेले सरनाईक यांना मोठा धक्का बसला आहे. (ED bump to Pratap Sarnaik; Assets worth eleven crores will be confiscated)
ईडीकडून ठाण्यातील दोन फ्लॅट आणि मीरा रोडवरील एका फ्लॅट लवकरच जप्त करण्यात येणार आहे. एनएसईल गैरव्यवहारमध्ये ईडीने या संपत्तीवर या पूर्वी तात्पुरतील कारवाई केली होती. या प्रकरणाचा तपास आता पूर्ण झाला असून ईडी संपत्ती जप्त करण्याच्या निर्णयापर्यंत पोचली आहे. मात्र, या निर्णयाविरोधात अपिल करण्याची मुभा प्रताप सरनाईक यांना देण्यात आली आहे.
एनएसईल गैरव्यहारातून काही लोकांना मोठी रक्कम देण्यात आली होती. त्यांचा संबंध प्रताप सरनाईक यांच्याशी जोडण्यात आला होता. या प्रकरणात मीरा भाईंदर शहराच्या मीरा रोड या भागातील आणि ठाण्यातील ११ कोटी ८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. ती संपत्ती आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर होती.
चौकशीत एखाद्या संपत्तीमध्ये संशय आढळला, तर ती मालमत्ता सील केली जाते. तपास पूर्ण होईपर्यंत त्या मालमत्तेची कोणी खरेदी-विक्री करू शकत नाही. तसेच, त्या मालमत्तेचा वापरही करू शकत नाही. पण, तपासात निष्पन्न झाल्याने ती मालमत्ता जप्त करण्याचा निर्णय सक्तवसुली संचानलयाने घेतला आहे.
दरम्यान, ईडीच्या कारवाईला कंटाळूनच आमदार प्रताप सरनाईक यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी भाजपशी जुळवून घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र, ठाकरेंनी त्याबाबत कोणतेही पाऊल उचलेले नव्हते. त्यानंतर आमदार प्रताप सरनाईक हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील झाले होते. त्यानंतर काही दिवसांत ईडीकडून सरनाईक यांच्यावर कारवाई करण्याचे टाळले होते. मात्र, आज पुन्हा त्यांना दणका दिला आहे. त्यामुळे मोठ्या आशेने शिंदे गटात गेलेल्या प्रताप सरनाईक यांना ईडीने चांगलाच दणका दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.