मुंबई : गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाचा घटक ठरलेल्या अंमलबजावणी संचनालयाचे सहसंचालक सत्यव्रतकुमार (Joint Director Satyavrat Kumar) यांची बदली करण्यात आली आहे.
सत्यव्रतकुमार हे मुंबईतील ईडीचे सर्वोच्च अधिकारी होते. अनिल देशमुख, अनिल परब, भावना गवळी, प्रताप सरनाईक अशा छोटया मोठ्या नेत्यांची चौकशी सुरु असताना ही बदली झाली आहे. सत्यव्रतकुमार हे नीरव मोदी, विजय मल्ल्या अशा बॅंक बुडव्यांच्या प्रकरणाची चौकशी प्रामुख्याने करत होते. नीरव मोदीच्या केससंदर्भात ते आज लंडनमध्येच होते. नीरव मोदीला जामीन मिळण्यासाठी लंडन न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ते तेथे असतानाच त्यांच्या बदलीचा आदेश आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. या चौकशीतून सत्यव्रतकुमार यांना हटविण्यात आले आहे की का, अशी शंका उपस्थित झाली आहे.
मोदी आणि मल्ल्या यांच्या प्रत्यार्पनास भारताला यश मिळण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यामुळेच या दोन्ही कर्जबुडव्यांशी संबंधित प्रकरणे महत्वाच्या वळणावर असतानाच त्यांच बदली झाली आहे.
गेली ७ वर्षे सत्यव्रतकुमार अंमलबजावणी संचनालयात कार्यरत होते. सामान्यत: एवढया प्रदीर्घ कालावधीसाठी प्रतिनियुक्तीवर अधिकारी ठेवले जात नसल्याने यापुढे अधिक कालावधीसाठी प्रतिनियुक्तीला मंजुरी देण्यास केंद्रीय दक्षता आयोगाने मान्यता दिलेली नाही, असे समजते. मात्र यासंबंधी कोळसा गैरवव्यवहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन राहून काही करता येईल काय हे पाहण्यास सांगितले आहे, असेही समजते. त्यांचा कार्यभार अतिरिक्त संचालकांकडे देण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.