ED चा हिशोब : १ कोटी ६ लाख ४४ हजार ३७५ रुपये वर्षा राऊतांच्या अकाऊंटवर

Sanjay Raut | ED | Varsha Raut : संजय राऊतांपाठोपाठ वर्षा राऊत यांनाही ईडीचे समन्स
Sanjay Raut | ED | Varsha Raut
Sanjay Raut | ED | Varsha RautSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : पत्राचाळ प्रकरणात शिवसेना (Shivsena) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यापाठोपाठ आता त्यांच्या कुटुंबीयांभोवतीही कारवाईचा फास आढळला आहे. या प्रकरणात ईडीने राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांनाही आता समन्स पाठिवले आहे. वर्षा राऊत यांच्या खात्यावरुन या प्रकरणातील व्यवहार समोर आल्यानंतर हे समन्स पाठविण्यात आल्याचे ईडीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

दरम्यान, न्यायालयात आज झालेल्या सुनावणीमध्ये राऊत यांच्या ईडी कोठडीत ८ ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. राऊत तपास आणि चौकशीसाठी सहकार्य करत नसल्याचा दावा या वेळी ईडीने केला. तसेच वर्षा राऊत यांच्या बॅक खात्यांची चौकशी करणे गरजेचे असून त्यांच्या खात्यातून अनोळखी व्यक्तीला पैसे पाठवण्यात आलेेले आहे. याबाबत संजय राऊत यांच्याकडे चौकशी केली असता ते सहकार्य करत नाहीत. ज्या व्यक्तींना पैसे हे दिलेले आहेत, त्यांना ईडीने चौकशीला बोलावलं आहे, अशी माहितीही ईडीने या वेळी दिली.

प्रवीण राऊत यांनी संजय राऊत यांना १ कोटी ०६ लाख ४४ हजार ३७५ रुपये रुपये दिले. जे वर्षा राऊत यांच्या बॅंकेच्या व्यवहारात दिसून आले आहेत. राऊतांचा परदेशाचा खर्चही प्रवीण राऊत करत होते. प्रवीण राऊत यांच्याकडून महिना २ लाख रुपये राऊत यांना मिळत होते, असे देखील ईडीने या वेळी सांगितले. याचा तपास होणे बाकी असून त्यानुसार कोठडीची गरज असल्याती मागणी केली. ती न्यायालयाने मान्य केली.

या सुनावणीच्या वेळी राऊत यांनी मला हृदयाचा त्रास आहे. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. रात्री जिथे मला झोपायला देतात तिथेही तिच परिस्थिती आहे, अशी तक्रार केली. त्यावर न्यायाधीशांनी या वर काय उपाययोजना करणार, असा सवाल ईडीच्या वकिलांना केला. ती खोली वातानुकूलीत असल्याचे वकिलांनी सांगितले. पण मला एसीचा त्रास होता. तेथे खिडकी नाही, असे राऊत यांनी पुन्हा सांगितले. त्यावर मोकळी हवा असणाऱ्या खोलीची व्यवस्था करण्यात तयार आहेत, असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आता काही तक्रार आहे का, असा प्रश्न न्यायाधीशांनी राऊतांना केला. त्यावर नाही, असे उत्तर राऊत यांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com