सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी शाळेची ज्या रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) गुरुजीमुळे जगाला ओळख झाली, ते येत्या दोन ते तीन दिवसांत राजीनामा देणार आहेत. ग्लोबल टिचर पुरस्काराने डिसले गुरुजींचा जागतिक पातळीवर गौरव झाला होता. या प्रकाराची गंभीर दखल शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी घेतली आहे. त्यांनी याबाबत शिक्षण विभागाला तातडीने आदेश काढला आहे.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी डिसले यांच्या पाठीशी उभी राहण्याची भूमिका घेतली आहे. त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, सोलापूरच्या परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी उच्च शिक्षणासंदर्भात दिलेल्या अर्जाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.दिलीप स्वामी यांच्याशी चर्चा करून हा अर्ज मंजूर करण्यास सांगितले आहे.
डिसले गुरुजींवरील आरोपांची चौकशी करण्यासाठी 11 महिन्यांपूर्वी चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल आता मान्य करण्यात आला आहे. त्यानुसार डिसले गुरुजींवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असून, .याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी दिली आहे. तीन वर्षे कामावर हजर न राहता त्यांनी पगार घेतल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, डिसले गुरुजींनी अमेरिकेत पीएचडी (PHD) करण्यासाठी सोलापूर शिक्षण विभागाकडे 6 महिन्यांची रजा मागितली होती, त्याला सोलापूर जिल्हा परिषद शिक्षाण विभागाकडून त्रुटी आहेत, असे सांगून नकार देण्यात आला होता. त्यांना पुन्हा मुख्याध्यापकांकडे अर्ज करण्यास सांगण्यात आले होते. यावर ज्या व्यवस्थेमध्ये आपल्या कामाचा आदर केला जातं नाही, अशा ठिकाणी काम करण्याच्या मानसिकतेमध्ये मी सध्या नाही, अशी भावना डिसले गुरुजींनी व्यक्त केली होती.
डिसले गुरूजी म्हणाले होते की, काम करण्यासाठी एक विश्वासाचं वातावरण असावं लागतं. मात्र, कामाची दखल न घेता अपमानास्पद वागणूक मिळत आहे. यामुळे माझ्या संयमालासुद्धा मर्यादा आहेत. आपल्या कामाचा आदर केला जात नाही त्या ठिकाणी मी काम करण्याच्या मानसिकतेमध्ये मी नाही. मला अमेरिकेत पीएचडी करण्यासाठी जायचे आहे. त्यासाठी सोलापूर शिक्षण विभागाकडे 6 महिन्यांच्या रजेसाठी रजा करण्यात आला होती. मात्र, माझ्या अर्जावर निर्णय घेण्याऐवजी माझ्यावर विविध आरोप केले जात आहे. मला अमेरिकेत जाऊन शिकता आले तर माझ्या शाळेतील व देशातील विद्यार्थ्यांना फायदा होईल. परंतु माझ्या प्रामाणिकपणावरच संशय घेतला जात असल्याने माझ्यासमोर राजीनामा देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. (Ranjitsinh Disale News Updates)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.