Sanjay Raut Defamation Case : संजय राऊत मालेगाव कोर्टात पोहाेचले; अब्रुनुकसानीच्या दाव्याला...

Sanjay Raut Defamation Case : दादा भुसेंनी ठोकला अब्रुनुकसानीचा दावा...
Sanjay Raut Defamation Case
Sanjay Raut Defamation Case Sarkarnama
Published on
Updated on

संजय राऊत मालेगाव कोर्टात पोहाेचले; अब्रुनुकसानीच्या दाव्याला...

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते व प्रवक्ते खासदार संजय राऊत मालेगाव कोर्टात पोहाेचले आहेत. सरकारमधील मंत्री दादा भुसे यांनी राऊतांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. संजय राऊत यांनी गिरणा प्रकल्पाच्या संदर्भाने मंत्री भुसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. भुसे यांनी कारखान्यात घोटाळा केल्याचा मजकूर सामना या वृत्तपत्रात संजय राऊत यांनी प्रकाशित केला होता. या प्रकरणी भुसे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. याच प्रकरणी राऊत मालेगाव कोर्टात हजर झाले आहेत.

राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीसाठी रवाना 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी वर्षा या शासकीय निवासस्थानी रवाना झाले आहेत. या भेटीचं कारण मात्र अद्यापही स्पष्ट झाले नाही. मात्र, राज ठाकरेंनी यापूर्वी घेतलेला टोलचा मुद्दा, मराठा आरक्षण व इतर काही मुद्द्यांवर या भेटीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

अजित पवारांचा छत्रपती संभाजीनगर नियोजित दौरा रद्द...

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आजचा नियोजित दौरा रद्द झाला आहे. अजित पवार ज्या हेलिकॉप्टरने दौरा करणार होते, त्यात बिघाड झाल्याने हा दौरा होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, मराठा समाजाच्या युवकांनी त्यांच्या दौऱ्याला विरोध केल्याने हा दौरा रद्द करण्यात आल्याचेही चर्चा आहे.

संजय राऊतांचा भाजपवर आरोप -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् अजित पवार जे काही बोलत आहेत, ती भाजपने त्यांना दिलेली स्क्रिप्ट आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना पराभूत करण्यासाठीच त्यांचा आटापिटा सुरू आहे. चारित्र्यहनन करण्याचा त्यांचा कार्यक्रम आहे. अल कायदासारखीच भाजपची नीती आहे, असा घणाघात राऊतांनी केला.

भाजपचे चार माजी नगरसेवकांवर कारवाई -

जळगाव पालिकेच्या घरकुल घोटाळ्यातील गुन्हा सिद्ध झालेल्या माजी चार नगरसेवकांना निवडणूक लढविण्यासाठी सहा वर्षांसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. याबाबतचा आदेश महापालिका आयुक्त विद्या गायकवाड यांनी जारी केला. गुन्हा सिद्ध झालेल्या २०१९ या कालावधीपासून त्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. महापालिका आयुक्तांनी याबाबतचे आदेश २९ नोव्हेंबर २०२३ ला जारी केले. यामध्ये भगत रावलमल बालाणी, सदाशिव गणपत ढेकळे, लताबाई रणजित भोईटे हे तीन निर्वाचित व कैलास नारायण सोनवणे हे स्वीकृत सदस्य आहेत. चारही माजी नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे आहेत. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com