Eknath Shinde Govt : ऐन लोकसभेत 21 साखर कारखान्यांना कर्जाची गॅरंटी; 'या' सत्ताधारी नेत्यांना फायदा

Cooperative Sugar Factories : आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच राज्यातील या कारखान्यांना सरकारने कर्जासाठी गॅरंटी दिल्याचे समोर येत आहे. या गॅरंटीमुळे राज्यातील 21 कारखान्यांना बूस्टर मिळणार आहे, तर त्या माध्यमातून मतदारांवर प्रभाव पाडण्याचाही प्रयत्न असल्याचे बोलले जाते.
Sugar Factory
Sugar FactorySarkarnama

Maharashtra Political News : सहकारी साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (एनसीडीसी) च्या माध्यमातून कर्ज दिले जाते. त्यासाठी मात्र राज्य सरकारने हमी द्यावी लागते. आता सरकारने ऐन लोकसभेच्या रणधुमाळीत राज्यातील 21 साखर कारखान्यांना कर्ज मिळण्यासाठी गॅरंटी दिली आहे. याचा सर्वात जास्त सत्ताधारी नेत्यांच्या कारखान्यांना फायदा होणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना चुचकारण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील पाच लोकसभा मतदारसंघांत मतदान पार पडले आहे. राज्यात निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू आहे, मात्र आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच राज्यातील या 21 साखर कारखान्यांना सरकारने कर्जासाठी गॅरंटी दिल्याचे समोर येत आहे. दरम्यान, या गॅरंटीमुळे राज्यातील 21 कारखान्यांना बूस्टर मिळणार आहे, तर त्या माध्यमातून मतदारांवर प्रभाव पाडण्याचाही प्रयत्न असल्याचे बोलले जाते. Sugar Factory

राज्य सरकारने दिलेल्या हमीत 21 पैकी 15 कारखाने हे सत्तेतील एकट्या शिवसेना शिंदे गटातील Eknath Shinde नेत्यांच्या ताब्यातील आहेत, तर उर्वरित सहा कारखान्यांत दोन शरद पवार गट, एक काँग्रेस, तर दोन अपक्ष आणि एक तटस्थ असणाऱ्या नेत्याचा समावेश आहे. राज्यातील अनेक कारखान्याने भांडवलाअभावी डबघाईला आले आहेत. त्यामुळे त्या कारखान्यांनी कर्जासाठी राज्य सरकारला साकडे घातले होते. मात्र यातील सत्तेत सहभागी झालेल्या नेत्यांच्या 21 कारखान्यांचीच सरकारने गॅरंटी घेतल्याचे स्पष्ट होत आहे.

सरकारमधील सहभागी नेत्यांच्या कारखान्यांना सरकारने हमी दिल्याचा आरोप भाजपचे नेते बसवराज पाटलांनी फेटाळले आहेत. ते म्हणाले कर्ज देताना सरकारने कुठल्याही राजकीय संबंधाचा विचार केलेला नाही. यातील सहा कारखाने हे विरोधकांच्या ताब्यातील आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Sugar Factory
Amol Kolhe News : शिवाजीराव आढळराव पाटील डमी उमेदवार; अमोल कोल्हेंनी उडवली खिल्ली

'या' कारखानांना सरकाने दिली कर्जाची गॅरंटी

- लोकनेते मारुतीराव घुले साखर कारखाना, नेवासा

- मुळा सहकारी साखर कारखाना, नेवासा

- शिवाजीराव नागवडे साखर कारखाना, श्रीगोंदा

- शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना, कोपरगाव

- कर्मवीर कुंडलिकराव रामराव जगताप पाटील कुकरी साखर कारखाना, श्रीगोंदा

- अगस्ती सहकारी साखर कारखाना, अकोले

- वृद्धेश्वर साखर कारखाना पाथर्डी, अहमदनगर

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

- रावसाहेब पवार घोडगंगा साखर कारखाना, शिरूर

- राजगड सहकारी साखर कारखाना, भोर

- किसनवीर साखर कारखाना, सातारा

- सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना, बीड

- क्रांतिवीर नागनाथ अण्णा सहकारी साखर कारखाना, सांगली

– किसनवीर सहकारी साखर उद्योग खंडाळा, सातारा

- संत दामाजी सहकारी साखर कारखाना, मंगळवेढा

- स्वामी समर्थ साखर कारखाना, अक्कलकोट

- तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना, कोल्हापूर

- विठ्ठल साई सहकारी साखर कारखाना, भाजप बसवराज पाटील Basavraj Patil

(Edited by Sunil Dhumal)

R

Sugar Factory
Varsha Gaikwad News : वर्षा गायकवाड यांना मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातून उमेदवारी जाहीर!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com