Mumbai Political News : राज्यभरात वाघनखांवरून वाद रंगला असतानाच सत्ताधारी व विरोधी पक्षाकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यातूनच माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना डिवचण्यासाठी मातोश्रीबाहेर शिंदे गटाकडून बॅनरबाजी करण्यात आली. मातोश्री परिसरात गुरुवारी सकाळी मोठ्या प्रमाणात बॅनर लावलेले आढळून आले. मात्र, काही वेळातच पोलिस व महापालिका प्रशासनाकडून हे बॅनर सुरक्षेच्या कारणास्तव काढून टाकण्यात आले. (Latest Political News)
छत्रपती शिवाजी महाराज यांनी अनेक मोहिमांमध्ये वापरलेली वाघनखं महाराष्ट्रात आणण्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केली होती. त्यामुळे भवानी तलवारीपाठोपाठ छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखं राज्यात येणार आहेत. याचे श्रेय घेत महायुतीकडून महाविकास आघाडीवर टीका केली जात आहे. परिणामी महाविकास आघाडी आणि महायुतीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याचे पाहायला मिळत आहेत.
वाघनखांवरून सुरू झालेल्या राजकारणात मतोश्री परिसरात बॅनरबाजी करून फोडणी देण्याचे काम शिंदे गटाकडून केले. शिवसेना शिंदे गटाकडून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना डिवचण्यासाठी गुरुवारी सकाळी मातोश्रीबाहेर बॅनरबाजी करण्यात आली. मात्र, लगेचच सुरक्षेचा व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस व पालिका अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करीत लगेचच हे पोस्टर काढून टाकले. त्यामुळे आता शिवसेना उद्धव ठाकरे गटांकडून आता या विरोधात काय बॅनरबाजी करण्यात येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Political News)
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मोहिमांमध्ये वापरलेली वाघनखं महाराष्ट्रात आणण्याची घोषणा मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी केल्यानंतर विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. यात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांसह शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आघाडीवर आहेत. आदित्य ठाकरेंनी लंडनच्या वस्तुसंग्रहालयात असणारी वाघनखं ही महाराजांनी वापरली होती का? याबाबत सरकारकडे स्पष्टता आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर सत्ताधाऱ्यांनी आदित्य यांचा समाचार घेतला होता. आता शिंदे गटाकडून बॅनरबाजी करून ठाकरेंनी आव्हान दिले आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.