Eknath Shinde With MP : एकनाथ शिंदेनी रात्री उशीरापर्यंत घेतली खासदारांची बैठक; लोकसभेसाठी प्लॅन काय?

Eknath Shinde Meeting With MP : कोण कुठून उभा राहणार, निवडून येण्याची कुणाची शक्यता?
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

Mumbai News : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काल रात्री उशीरापर्यंत शिवसेना खासदारांची (Shivsena MPs) बैठक घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीवरती (Lokasabha Election) या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे.

शिवसेनेकडे सध्या तेरा खासदार आहेत. यापैकी किती खासदार पुन्हा निवडून येऊ शकतात? कुठल्या मतदारसंघामध्ये अधिक काम करावं लागेल. या विषयावर या बैठकीत सखोल चर्चा झाली. गेल्याच आठवड्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा मुंबई दौऱ्यावर आलेले असताना त्यांची एकनाथ शिंदेसोबत एक तास बंद दाराआड चर्चा झाली होती.

लोकसभा निवडणुकीत भाजपला शिवसेनेची जास्तीत जास्त मदत व्हायला हवी. आणि यासाठीच अधिकाधिक जागा निवडून आणल्या पाहिजे, अशा स्पष्ट संदेश नड्डा यांनी शिंदेंना दिला असल्याचे समजते. याच पार्श्वभूमीवर शिंदेनी काल खासदारांची बैठक बोलवली होती, अशी माहिती मिळत आहे.

Eknath Shinde
Rahul Gandhi Tweet : संसदेची निर्मिती अहंकाराच्या विटांनी नव्हे, संवैधानिक मूल्यांनी होते; राहुल गांधींनी मोदींना सुनावलं !

काल जवळपास दोन तासांपेक्षा अधिक वेळ ही मिटींग सुरू होती. १३ खासदार या बैठकीला उपस्थित होतो. आगामी लोकसभेसाठी शिवसेनेची कशी भूमिका असली पाहिजे. सद्या तरी सर्व ४८ जागांवर भाजपकडून लक्ष केंद्रीत करण्यात आलेले आहे.

यामुळे शिवसेनेने सुद्धा आपल्या जागांवर चाचपणी करायला सुरूवात केली आहे. जागावाटपाबाबत कुठलीही चर्चा झाली नसली तरी लोकसभा निवडणुका शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार असल्याचे माहिती मिळत आहे. त्याच अनुषंगाने एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली आहे.

Eknath Shinde
Congress News : काँग्रेसची रणनीती ठरली! राज्यभर मेळाव्यांचा धडाका; राज्यात राबवणार 'कर्नाटक पॅटर्न' !

लोकसभेची आगामी रणनीती कशी असावी? कोणता उमेदवार कोणत्या ठिकाणी उभा असावा, लवकरच याबाबचची घोषणा करण्यात येईल, जागावाटपाबाबत चर्चा होऊन, शिवसेना आपल्या जागा कायम ठवून निवडणुकीत उतरण्याची तयारी करत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com