Eknath Shinde in Adipurush : 'आदिपुरुष' मध्ये मुख्यमंत्री शिंदेंची 'एन्ट्री'; Photo व्हायरल, पोलिसांची डोकेदुःखी वाढली..

Eknath Shinde : ठाणे पोलिसांनी केलेले ट्विट व्हायरल होत आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : प्रभास (Prabhas) आणि कृति सेनन (Kriti Sanon) यांची प्रमुख भूमिका असलेला 'आदिपुरुष'(Adipurush)चित्रपट सध्या वादात सापडला आहे. यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 'एन्ट्री'झाली आहे. मुख्यमंत्र्यांचे या चित्रपटाबाबतचे मीम्स सध्या व्हायरल होत आहे. हे मीम्स व्हायरल करणाऱ्या युवकाचा पोलीस सध्या शोध घेत आहेत.

एका नेटकऱ्याने या चित्रपटातील एका पात्राचा थेट मुख्यमंत्री शिंदेंशी संबंध जोडला आहे. त्याने यासंबंधीचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यावर ठाणे पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला आहे. सध्या या मीम्सची पोस्ट व त्यावरील ठाणे पोलिसांनी केलेले ट्विट व्हायरल होत आहे.

Eknath Shinde
Shashi Tharoor Alert Congress : कर्नाटकातील विजयाने अति उत्साही होऊ नका ; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा घरचा आहेर

त्या तरुणाने एकनाथ शिंदे यांचा फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये, ‘एकनाथ शिंदे आदिपुरुषात आहेत हे माहित नव्हते.’असं लिहिलं आहे. त्यावर ठाणे पोलिसांनी त्या पोस्टला प्रतिसाद देत त्यांचा फोन क्रमांक विचारला आहे. अभय नावाच्या नेटकऱ्यांने ही पोस्ट केली आहे. पोलिसांनी हे ट्विट करणाऱ्या अभय नावाच्या तरुणाचा फोन नंबर मागितला आहे.

या टि्वटवरुन अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केली आहे. त्याच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. अभयने हे टि्वट अद्याप डिलीट केलेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रिलीजच्या पहिल्याच दिवशी हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या सिनेमावर एका हिंदू संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे.या सिनेमामुळे रामायण, राम आणि देशाच्या संस्कृतीची खिल्ली उडवली जात असल्याचं याचिकेत म्हटलं आहे.

"आदिपुरुष" सिनेमातील रावण, राम, सीता आणि हनुमान यांच्याशी संबंधित आक्षेपार्ह दृश्ये हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. असे हिंदू संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी म्हटले आहे.सिनेमातील दृश्ये रामायणातील धार्मिक पात्रांच्या चित्रकरणाच्या विरुद्ध आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com