दीड महिन्यांपूर्वी आम्ही ५० थरांची मोठी हंडी फोडली ; टेंभीनाक्यावरून मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोला

Eknath Shinde : गुवाहाटीला जायचं आहे, कामाख्या देवीचं दर्शन घ्यायला जाऊया,"
eknath shinde, Uddhav Thackeray
eknath shinde, Uddhav Thackeraysarkarnama
Published on
Updated on

ठाणे : शिवसेनेत बंडखोरी करून एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी सेनेचे ४० आमदार फोडले. तर १० अपक्षांना सोबत घेऊनभाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यांनी राज्यातील सत्ताकारणातील सर्वात मोठी हंडी फोडली. हाच संदर्भ घेऊन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर भाष्य केलं. धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या टेंभी नाक्यावरील (tembhinaka) दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी त्यांनी गोविंदांशी संवाद साधला.

एकनाथ शिंदे म्हणाले, "शेतकरी,कष्टकऱ्यांप्रमाणेच हे सरकार गोविंदांचंही आहे. दीड महिन्यांपूर्वी आम्ही सर्वांत मोठी हंडी फोडली. ५० थर लावले होते. गुवाहाटीला जायचं आहे, गुवाहटीला जाऊया. मुंबई, सूरत व्हाया गुवाहाटीला कामाख्या देवीचं दर्शन घ्यायला जाऊया,"

“दीड महिन्यापूर्वी आम्ही देखील सगळ्यात मोठी हंडी फोडली. तशी हंडी कठीण होती आणि खूप उंच होती. पण आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे हंडी फोडली. बाळासाहेब, दिघेसाहेबांच्या आशीवार्दामुळे फोडली. ५० थर लावले,” असे ते मिश्किलपणे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.

eknath shinde, Uddhav Thackeray
Narottam Mishra : अभिनेता अर्जुन कपूरवर भाजप नेत्याचा हल्लाबोल

"हे सरकार फक्त शेतकरी, कष्टकाऱ्यांचं नाही तर गोविंदांचंही आहे. आम्ही कबड्डी, खो-खोप्रमाणेच दहीहंडीलाही खेळाचा दर्जा दिला. प्रताप सरनाईक याप्रकरणी सतत पाठपुरावा करत होते. अखेर दहीहंडीला खेळाचा दर्जा दिला," असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

"आम्ही गोविंदांसाठी तीन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. दहीहंडीसाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. तर, अपघात घडल्यास गोविंदांसाठी विमाही जाहीर केला आहे. पुढच्या वर्षीपासून प्रो कबड्डीप्रमाणेच प्रो गोविंदा स्पर्धाही आयोजित करण्यात येणार आहे.” असे मुख्यमंत्री म्हणाले.

"नियम तर पाळले पाहिजेत. गणपती हा आपला दैवत आहे. मर्यादा वगैरे बस झाल्या. दोन वर्षे मर्यादा, नियम पाळले. महाराष्ट्रातील सर्वांत मोठा सण गणेशोत्सव आहे. त्यामुळे नियम शिथिल केले. पैसेही माफ केले. किती पैसे मिळणार आहेत त्यातून. दोन अडीच वर्षांत आपण निर्बंधात होतो. पण विघ्नहर्त्यांने आपले विघ्न दूर केले. मोठ्या धूमधडाक्यात सण साजरा करूया. नियम पाळून सर्व साजरं करूया, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं

"आनंद दिघेंनी सुरू केलेला उत्सव महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला आहे. धर्म आणि संस्कृती जोपासण्याचे काम दिघे यांनी केले. आंनद दिघे बोलले होते की ठाण्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. त्यांच्या बहिनीने सुद्धा हेच सांगितले होते. त्यांची एवढी दूरदृष्टी होती. आणि दिघे यांचे स्वप्न आज पूर्ण केले," असे मुख्यमंत्री म्हणाले. अभिनेत्री श्रद्धा कपूरने या उत्सवात गोविंदांशी संवाद साधला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com