राहुल क्षीरसागर
Uddhav Thackeray News : शिवसेनेतील फूटीनंतर ठाणे जिल्हातील शिवसैनिक एकनाथ शिंदेंच्या मागे ठामपणे उभे राहिल्याचे चित्र होते. शिंदे ज्या पूर्व कोपरी मतदारसंघाचे नेतृत्व करतात तो शिंदेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र, याच बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने सुरुंग लावला आहे.
मागील 20 ते 22 वर्षापासून उपशाखाप्रमुख असलेले व विद्यमान उपविभाग प्रमुख आबा मोरे यांच्यासह 200 ते 300 शिवसैनिकांनी मंगळवारी मातोश्रीवर जावून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधान बांधत शिवसेना उद्धव बाळासाहे ठाकरे पक्षात प्रवेश केला.मोरे हे माजी सभागृह नेते पांडुरंग पाटील यांचे खांदे समर्थक मानले जातात. त्यांच्या पक्ष प्रावेशामुळे कोपरीतील राजकीय वातावरण बदलले आहे.
मागील काही दिवसांपासून भाजपने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील पदाधिकारी व माजी नगरसेवकांना भाजपात पक्ष दिला. त्यामुळे शिंदे आणि भाजपात तणाव असल्याची चर्चा होती. त्यातच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने शिंदेंना धक्का दिला.
शिंदेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांकडून, स्थानिक माजी नगरसेवकांकडून मिळत असलेले दुय्यम स्थान, मागील 9 वर्षात विविध स्थानिकांची कामे घेवून गेले असता, एकही काम केले नसल्याचा आरोप उपविभाग प्रमुख आबा मोरे यांनी करत ठाकरेंची मशाल हाती घेतली.
मोरे यांनी सांगितले की, ज्येष्ठ शिवसैनिकांना सन्मानाची वागणूक दिली जात नाही, पदाधिकारी, माजी नगरसेवक मनमानी करत आहेत, या बाबी आपण वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिल्या. मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आपण पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. मातोश्रीवर झालेल्या पक्ष प्रवेशाच्या वेळी माजी खासदार राजन विचारे, युवासेना कोपरी पाचपाखाडी विधानसभा प्रमुख राजेश वायाळ आदी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.