Kopri Pachpakhadi Assembly Constituency Politics News :
एकीकडे लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असले तरी ठाण्यात आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने तयारी सुरू केल्याचे दिसत आहे. थेट मुख्यमंत्री Eknath Shinde यांचा मतदारसंघ असलेल्या कोपरी- पाचपाखाडीतील कोपरीतच केंद्र सरकारकडून भाजपच्या मागणीनुसार रसद पुरवण्याचे काम केले आहे.
कोपरी येथील जुन्या जलकुंभांच्या जागी दोन नवीन जलकुंभ उभारण्यात येणार असल्याने कोपरी परिसरातील सुमारे एक लाखांहून अधिक नागरिकांना केंद्र सरकारकडून दोन नवीन जलकुंभांची भेट मिळाली आहे. यापुढील काळात कोपरीवासीयांना सुरळीत पाणीपुरवठा होणार आहे.
कोपरी येथे 40 वर्षांपूर्वी उभारलेल्या दोन जलकुंभांची दुरवस्था झाली आहे. या जलकुंभातील काही ठिकाणांहून पाण्याची गळती होत असल्यामुळे अस्वच्छता होत होती. त्याचबरोबर जलकुंभ कोसळून हानी होण्याची भीती होती. या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना 10 एप्रिल 2023 रोजी पत्र पाठवून केंद्र सरकारच्या अमृत-2 योजनेतून दोन्ही जलकुंभांच्या ठिकाणी नवीन जलकुंभांचे काम उभारण्याची मागणी केली होती.
या योजनेच्या आराखड्यामध्ये कोपरी परिसराचा समावेश करण्यात आला नव्हता. त्यामुळे भाजपचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या माध्यमातून महापालिकेकडे पाठपुरावा करण्यात येत होता. कोपरी परिसरातील वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी जलकुंभ व पाणी वितरण व्यवस्था आवश्यक असल्याचे आग्रही पद्धतीने मांडले होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, दोन्ही नवीन जलकुंभांच्या कामाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लागू केलेल्या अमृत योजनेतून मंजुरी मिळाली. लवकरच कामाचा कार्यादेश काढण्यात येईल. त्यामुळे लवकर काम पूर्ण होऊन रहिवाशांना दिलासा मिळणार आहे. तसेच कोपरी नागरिकांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटला आहे.
अशाप्रकारे लोकसभेपाठोपाठ विधानसभा आणि त्यानंतर येणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या मतदारसंघात केंद्राने रसद पाठवून भाजपने तयारीला सुरुवात केली आहे. वेळप्रसंगी शिवसेना शिंदे गट आणि भाजप आमने-सामने आले तर वावगे ठरणार नाही.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.