Eknath Shinde News : शिवसेनेच्या 'या' चार मंत्र्यांसह वीसहून अधिक आमदार नॉट रिचेबल

एकनाथ शिंदे हे गुजरातमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे.
Eknath Shinde Latest Marathi News, Shivsena Political Crisis News
Eknath Shinde Latest Marathi News, Shivsena Political Crisis NewsSarkarnama

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेत भूकंप झाले आहे. पक्षाचे मोठे नेते व मंत्री एकनाथ शिंदे निवडणुकीनंतर नॉट रिचेबल आहेत. त्यांच्यासह चार मंत्री आणि जवळपास वीसहून अधिक मंत्री त्यांच्यासोबत असल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे यांच्यासह बहुतेक जण गुजरातमध्ये असल्याची माहिती आहे. (Eknath Shinde Latest News)

नॉट रिचेबल मंत्र्यांमध्ये शिंदे यांच्यासह गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई, संदीपान भूमरे, दादा भूसे आणि अब्दूल सत्तार या नेत्यांचा समावेश आहे. तर जवळपास वीस आमदारांशी शिवसेना नेत्यांचा संपर्क होत नसल्याची माहिती समोर आली आहे.

Eknath Shinde Latest Marathi News, Shivsena Political Crisis News
एकनाथ शिंदेंची नाराजी शिवसेनेला भोवली?; 11 मतांना भाजपचा सुरुंग...

हे आहेत नॉट रिचेबल आमदार

1. एकनाथ शिंदे

2. दादा भुसे

3. शंभूराज देसाई

4. अब्दुल सत्तार

6. संजय सिरसाट

7. संदीपान भुमरे

8. शहाजी पाटील

9. तानाजी सावंत

10. प्रकाश आबिटकर

11. ज्ञानराज चौगुले

12. किशोर पाटील

13. प्रताप सरनाईक

14. रमेश बोरणारे

15. उदयसिंह राजपूत

16. प्रदीप जैस्वाल

17. महेश शिंदे

18. शांताराम मोरे

19. विश्वनाथ भोईर

20. संजय राठोड

21. संजय गायकवाड

22. भरत गोगावले

23. महेंद्र थोरवे

24. श्रीनिवास वनगा

Eknath Shinde Latest Marathi News, Shivsena Political Crisis News
संजय राठोड नॉटरीचेबल; विधानपरिषद निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला धक्का

दरम्यान, एकनाथ शिंदे हे दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. या पत्रकार परिषदेत ते आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. या पत्रकार परिषदेनंतर राज्यातील ठाकरे सरकार जाणार की राहणार, हे स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, मध्यरात्री शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत 13 आमदार अनुपस्थित होते. त्यानंतर शिवसेनेच्या गोटातील चिंता आणखी वाढली आहे. या घडामोडींमुळे मंत्री छगन भुजबळ नाशिकमधील सर्व कार्यक्रम रद्द करुन मुंबईकडे रवाना झाले आहेत.

मंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून नाराजीनाट्य सुरू होते. आमदार संजय राठोड यांनाही पुन्हा मंत्रीमंडळात संधी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांना केवळ आश्वासन मिळत आहे. त्यामुळे आमदार राठोड नाराज होते. राठोड हे एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मानले जातात. शिवसेनेचे नेते गायब झाल्याने नवीन राजकीय समीकरण जुळून येण्याची चिन्हे आहेत. या धक्कातंत्राने भारतीय जनता पक्ष आपल्या सत्ता स्थापन करण्याच्या हेतूत यशस्वी होऊ शकते, अशीही चर्चा रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com