Narendra Modi :
Narendra Modi : Sarkarnama

Eknath Shinde : कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत मोदींचे भक्त? शिंदेनी सांगितला भन्नाट किस्सा!

Narendra Modi : दावोसमध्ये ते मला म्हणाले, मी मोदींचा भक्त, माझ्यासोबत फोटो काढून म्हणाले...
Published on

Eknath Shinde : आज मुंबईच्या दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आले आहेत. मोदींच्या हस्ते मुंबईतील विविध विकास कामं व लोकार्पणाचं कार्यक्रम होणार आहे. यानंतर आज मोदी बीकेसी मैदानात सभा घेणार आहेत. सभेच्या ठिकाणी आता भाजप कार्यकर्ते आणि लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण केले आहे.

Narendra Modi :
Narendra Modi News : मुंबई मेट्रो, रस्ते, पालिकेच्या दवाखान्यासह पंतप्रधानांच्या हस्ते हजारो कोटींच्या कामाचे उद्घाटन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावोस दौऱ्यामधलं एक किस्सा यावेळी सांगितलं. शिंदे म्हणाले, मी दावोसला गेलो होतो तेव्हा तिथे मोदींचा डंका वाजताना दिसला. दावोसमध्ये मला अनेक लोक भेटले, विविध देशातले लोक भेटले. अनेक देशांचे प्रधानमंत्री होते. अध्य़क्ष व विविध देशांचे मंत्री भेटले. ते मला मोदींबद्दलच विचारायचे. मोदींबद्दल चौकशी करायचे,

पुढे ते म्हणाले, मला लक्झंबर या देशाचे प्रधानमंत्री भेटले. ते मला म्हणाले की, 'मी नरेंद्र मोदींचा भक्त आहे.' यांनंतर त्यांनी माझ्यासोबत फोटो काढला आणि म्हणाले हा फोटो मोदींना दाखवा, अशी आठवण शिंदेंना यावेळी सांगितली.

Narendra Modi :
Narendra Modi News : मोदींच्या आगमनापूर्वीच बीकेसीमधली कमान कोसळली!

जर्मनी देशाचे काही लोक भेटले, सौदीचे काही लोकभेटले म्हणाले, 'तुम्ही मोदींसोबत आहे ना," मी म्हणाले, मी मोदींचाच माणूस आहे. मोदींचा डंका आपला देशात वाजतोय पण, परदेशातही जोरदार वाजतोय, असे शिंदे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com