Mahayuti Politics : महायुतीमध्ये वादाची ठिणगी; एकनाथ शिंदेंचा शिलेदार भाजपला भिडला, थेट स्वबळाची भाषा!

Kalyan-Dombivli Politics Shivsena Vs BJP : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंची शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना कल्याण डोंबिवलीत रंगला आहे, दोन्ही पक्षाच्या जिल्हाप्रमुखांनी एकमेकांना आव्हान दिले आहे.
Kalyan-Dombivli Politics
Kalyan-Dombivli Politics sarkarnama
Published on
Updated on

Kalyan-Dombivli News : आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडी आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करत असताना महायुती मधील शिवसेना शिंदे गट आणि भाजपामध्ये मात्र युतीच्या चर्चावरून कलगीतुरा रंगला असल्याचे दिसून येते.

कल्याण येथे शिदेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी एका कार्यक्रमात भाजपाला ओपन चॅलेंज देत म्हटले की, 'काम न करता आम्ही निवडून येऊ असे कोणाला वाटत असेल तर त्यांना आमचं ओपन चॅलेंज आहे.सोबत आला तर सोबत घेऊ अन्यथा आडवे करू. युती होवो अथवा ना होवो.'

मोरे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना आवाहन करताना म्हटले की, 'युती व्हायची तेव्हा होईल मात्र प्रत्येक पदाधिकारी, शिवसैनिकांनी प्रत्येक प्रभागात धनुष्यबाणावर सीट निवडून आलीच पाहिजे, अशी तयारी ठेवावी.'

मोरेंच्या वक्तव्यावा भाजपाचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. परब म्हणाले, 'अरविंद मोरे यांनी तरी निदान आडवे पाडण्याची भाषा करु नये. कारण मागच्या निवडणूकीत आमच्या सचिन खेमाणी यांनी त्यांना आडव पाडल होतं. प्रसिद्धीसाठी काही राहिलं नाही त्यामुळे ते काही ना काही बोलतात. युतीचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. त्यांनी त्याविषयी बोलू नये.'

Kalyan-Dombivli Politics
Beed News : गोपीचंद पडळकरांचा मोर्चा होताच जेलरला दणका ; पेट्रस गायकवाड यांची थेट नागपूरला बदली!

'युती कधी होईल, कोण करेल, काय होईल हे वरिष्ठ बघून घेतील. युती नाही झाली तर सर्व ठिकाणी उमेदवार लढण्याची ताकद कुवत आणि धमक आमच्यात आहे असे देखील परब यांनी सांगितले.

मनसेने भाजप-शिवसेनेला डिवचले

भाजप-शिवसेनेत सुरू असलेल्या शा‍ब्दिक वादावर मनसेचे माजी नगरसेवक मनोज घरत म्हणाले, चर्चा आणि फोकस हा केवळ युती होणार की नाही होणार यावर ठेवण्यासाठी हे वातावरण पेटवत आहेत. गेले 25 ते 30 वर्षे शिवसेना भाजपाची सत्ता केडीएमसीवर आहे. 25 ते 30 वर्षापासून शहरात परिस्थिती जैसे थे आहे. सर्प दंशाने एका चिमुकलीचा मृत्यू होतो, रस्त्यावर खड्ड्यांचे प्रमाण तसेच आहे. दिवाळी दोन दिवसांवर आली अजूनही रस्त्यावर खड्डे आहेत. धुळीचा सामना सर्वांना करावा लागत आहे. या पक्षांना त्यांची जागा या महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात सुज्ञ जनता नक्की दाखवेल.

Kalyan-Dombivli Politics
Ram Shinde VS Rohit Pawar : रोहित पवारांवर राम शिदेंचा पलटवार, पासपोर्ट प्रकरणात धक्कादायक खुलासा; म्हणाले, 'घायवळच्या मामानेच...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com