Mumbai : अनेक वर्षांपासून खितपत पडलेल्या मराठा आरक्षणाच्या तिढ्यावर तोडगा काढल्याचे श्रेय घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशीच्या सभेतून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ‘हे सरकार देणाऱ्यांचे आहे, घेणाऱ्यांचे नव्हे,’ असे नमूद करीत शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर मराठा आरक्षण गमावल्याबद्दल टीका केली.
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ मराठ्यांचेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. शिवरायांच्या साक्षीने मराठा समाजाला आरक्षण देणार अशी शपथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली होती. शनिवारी (ता. 27) शिंदे यांनी या शपथेचे स्मरण सर्वांना जाहीरपणे करून दिले. यावर बोलताना शिंदे म्हणाले, ‘हा एकनाथ शिंदे जो शब्द देतो, तो पूर्ण करतो. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने शपथ घेतली होती की मराठा समाजाला आरक्षण देणार. हा शब्द पूर्ण केला आहे.’
आपण घेतलेल्या शपथेचा पुनरुल्लेख करीत शिंदे यांनी आपल्यामुळेच मराठा समाजाला हातून निसटलेले आरक्षण पुन्हा परत मिळाल्याचे श्रेय घेतले. त्यामुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा ‘दिलेला शब्द पूर्ण करणारा मुख्यमंत्री’ अशी झाली आहे. ‘घेणारे नव्हे, देणाऱ्यांचे सरकार’ या उल्लेखातून शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना लक्ष दिले असते, तर मराठा आरक्षण गेले नसते, अशी अप्रत्यक्ष टीकाच शिंदे यांनी केली.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा आपले गुरू म्हणून उल्लेख करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पुन्हा ठाणे आणि मुंबईतील आपली पकड घट्ट करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांच्या वाशीतील भाषणानंतर जे उद्धव ठाकरे यांना करता आले नाही ते एकनाथ शिंदे यांनी करून दाखविल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. आपण भूमिपुत्र असल्याचा उल्लेख करीत शिंदे यांनी केलेल्या भाषणातील उल्लेखानंतर आपल्याला संघर्षातून सर्वकाही मिळवावे लागले. उलट उद्धव ठाकरे यांना सर्व काही आयते मिळाले, असा संदेशही शिंदे यांनी कोणाचेही नाव न घेता केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मराठा समाजाच्या वाशी येथील सभेला राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे अनुपस्थित होते. फडणवीस आणि पवार हे का येऊ शकले नाही, याचे स्पष्टीकरण शिंदे यांनी आपल्या भाषणाच्या शेवटच्या टप्प्यात दिले. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीला कारण कोणतेही असले तरी एकनाथ शिंदे यांचे मराठा समाजात व मुंबईत जोरदार ‘प्रोजेक्शन’ मराठा आरक्षणाच्या व्यासपीठावरून झाले आहे. त्यामुळे शिंदे आता मराठा समाजासाठी हिरो ठरले आहेत.
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.