Eknath Shinde: कृणाल कामराच्या विडंबनावर एकनाथ शिंदे पहिल्यादांच बोलले....

Eknath Shinde on Krunal Kamra Song :आरोपाला कामातून आम्ही उत्तर दिले. त्यामुळे जनतेने आम्हाला पुन्हा निवडून दिले. 80 पैकी 60 जागा आम्हाला मिळाल्या.
Aaditya Thackeray attack on shiv sena Eknath shinde
Aaditya Thackeray attack on shiv sena Eknath shinde sarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 25 March 2025: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक कविता सादर करणाऱ्या स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामराच्या (Kunal Kamra) विरोधात शिवसेना आक्रमक झाली.

त्यांच्या स्टुडिओची तोडफोड केल्यानंतर त्याने शिंदेंची माफी मागावी, अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे. या प्रकरणावर एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत शिंदे यांनी यावर भाष्य केलं आहे.

मी आरोपांवर प्रतिक्रिया देतच नाही. तीन वर्षांपूर्वी सरकार स्थापन झाल्यापासून आरोपांच्या फैरी काही लोकांकडून झाडल्या जात आहे. मी नेहमी सांगायचो की, आरोपांना मी कामाने उत्तर देणार आहे. आरोपांना आरोपाने उत्तर द्यायला लागलो, तर आपला फोकस बदलतो.

आरोपाला कामातून आम्ही उत्तर दिले. त्यामुळे जनतेने आम्हाला पुन्हा निवडून दिले. 80 पैकी 60 जागा आम्हाला मिळाल्या. ठाकरेंच्या शिवसेनेला केवळ 20 जागा निवडून आणता आल्या," असा टोला शिंदेंनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

Aaditya Thackeray attack on shiv sena Eknath shinde
Kunal Kamra: एकनाथ शिंदेंची टिंगल उडवणाऱ्या कुणाल कामराला पोलिसांनी बजावलं समन्स

कृणाल कामरा यांच्या स्टुडिओंची शिवसैनिकांनी तोडतोड केली त्याबाबत शिंदे यांनी खुलासा केला आहे. "अ‍ॅक्शनला रिअ‍ॅक्शन असते. मी संवेदनशील आहे. मला सहन करण्याची खूप ताकद आहे. मी कुणालाही बोलत नाही. शांत राहणे, काम करणे, कामावर फोकस केंद्रीत करणे आणि लोकांना न्याय देण्याचे काम मी करतो," असे शिंदे म्हणाले.

"मी तोडफोडीचे समर्थन करत नाही. समोरच्याने देखील आरोप करताना कुठल्या स्तराला जातो, हे पाहिले पाहिजे. त्यामुळेच देदिप्यमान असं यश आम्हाला मिळालं आहे," असे शिंदे यांनी सांगितले.

मी कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण, कार्यकर्त्यांच्या भावना असतात. याच माणसाने सर्वोच्च न्यायालय, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारमन, अर्णब गोस्वामी, उद्योगपतींबद्दल काय विधाने केली आहेत? ते पाहा. हे काय अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. हे कुणाची तरी सुपारी घेऊन आरोप केलेले आहेत. त्यामुळे मी त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. मी बोलणार सुद्धा नाही. मी काम करणारा माणूस आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान कुणाल कामरा याच्या विरोधात खार पोलिसांनी समन्स बजावलं आहे. कुणाल कामरा यांच्या मुंबईतील कुटुंबियांकडे खार पोलिसांनी समन्स दिले आहे. कुणाल याला व्हॅाटस्अँपवरुन पोलिसांनी हे समन्स पाठवले आहे.चौकशीसाठी हजर राहावे, असे पोलिसांनी समन्समध्ये म्हटलं आहे.

मात्र कुणाल कामरा हा आपल्या विधानावर ठाम आहे. कोर्टानं सांगितलं तरच माफी मागणार, अशी ठाम भूमिका कुणालने घेतली आहे. याबाबत त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. कुणाल कामरा सध्या तामिळनाडू मध्ये असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com