Eknath Shinde News : ठाण्यात शक्तिस्थळावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीनंतरही शिवसैनिकांची पाठ?

Eknath Shinde Pays Tribute To Anand Dighe In Thane : मुख्यमंत्री शिंदे येऊनही शिवसैनिकांनी गर्दी का केली नाही?
Eknath Shinde Thane
Eknath Shinde ThaneSarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde Shiv sena Thane News :

मुख्यमंत्री म्हटले तर, नेहमी त्यांच्या अवती भवती पक्षातील आमदार, पदाधिकारी-कार्यकर्ते यांचा गराडा असतो. त्यातच त्यांच्या गुरुवर्यांच्या जयंती दिनानिमित्त आयोजित केलेल्या ठाण्यातील सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येणार असे म्हटले तर गर्दी ही होईलच, असा अंदाज पोलीस यंत्रणेला होता.

मात्र यंदाच्या दिवंगत शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या जयंतीला ठाणे येथील खारकर आळीतील शक्तिस्थळावर नेहमीपेक्षा यंदा गर्दी ओसरल्याचेच पाहण्यास मिळाले. गर्दी ओसरल्याचे नेमके कारण समजू शकले नाही. पण या सोहळ्यास ना मुख्यमंत्र्यांचे ( Eknath Shinde ) मंत्रिमंडळातील सहकारी होते, ना त्यांचे शिवसैनिक. इतर पदाधिकारी नसल्याने ही गर्दी ओसरली असावी, अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

Eknath Shinde Thane
Thane Shiv Sena Politics : ठाकरेंचे खासदार येताच ध्वनिक्षेपकावर लागले 'भेटला विठ्ठल माझा...'; शक्तिस्थळावर काय घडले?

शिवसेनेत फूट पडल्यानंतर दोन गट पडले. त्यामुळे दिवंगत आनंद दिघे यांचे शिष्यही विभागले गेले. माजी आमदार रवींद्र फाटक, ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, माजी महापौर रमेश वैती, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे आदी शिष्य शिंदे गटात गेले. तर ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्यासह दिघे यांचे पुतणे तथा जिल्हाप्रमुख केदार दिघे, शहरप्रमुख प्रदीप शिंदे ही मंडळी उद्धव ठाकरे गटासोबत राहिली. अशाप्रकारे दिवंगत दिघे यांचे शिष्य विभागले गेले.

शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्यासोबत गेलेल्या सदस्यांनी दिघे यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी शक्तिस्थळावर धाव घेतली होती. यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्ते ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाण्यातील प्रत्येक कार्यक्रमाला अक्षरशः त्यांच्या अवती भवती गराडा पाहण्यास मिळतो. मात्र शनिवारी दिवंगत दिघे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित शक्तिस्थळावर गर्दी उसळेल, असा अंदाज असल्याने पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

साडेबारा वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री येतील, असा अंदाज होता. त्यापूर्वीच ठाकरे गटाने शक्तीस्थळाला भेट देत दिघे यांना अभिवादन केले. त्यानंतर अर्ध्या तासाने मुख्यमंत्री शिंदे आले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार संजय शिरसाट यांच्या व्यतिरिक्त कोणी नव्हते.

यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी खासदार मिलिंद देवरा तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पण ज्या ठिकाणी सोहळा होता तेथील मैदान ही गर्दी भरू न शकणारी होती. त्यामुळे गर्दी ओसरली असेच म्हणावे लागेल. ही गर्दी का ओसरली हे समजत नाही.

बहुदा शिंदे दिलेल्या वेळेत (मुख्यमंत्री असल्याने कामामुळे) येत नाही. म्हणून किंवा पदाधिकारी - कार्यकर्ते न आल्याने ही गर्दी ओसरल्याचे राजकीय तज्ज्ञ मंडळींकडून सांगण्यात येत आहे. दुसरे नवी मुंबईत मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरू असल्यामुळेही कार्यकर्ते आले नसावेत, असेही बोलले जात आहे.

edited by sachin fulpagare

Eknath Shinde Thane
Shrikant Shinde Maratha Reservation : मुख्यमंत्री अन् टीमची अहोरात्र धडपड तर खासदार श्रीकांत शिंदे सांभाळत होते 'ही' मोठी जबाबदारी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com