Lok Adalat and Thane News : मुख्यमंत्र्यांचं ठाणे 'तडजोडीत' अव्वल; सलग सहाव्यांदा महाराष्ट्रात पहिला क्रमांक!

Lok Adalat Cases News : न्यायालयात प्रलंबित असणारी 30 हजार 510 प्रकरणे निकाली काढली आहेत.
Thane
ThaneSarkarnama
Published on
Updated on

Thane District News : महाराष्ट्रात फोडाफोडी आणि तडजोडीचे राजकारण जोरदार सुरू आहे. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे जिल्हा हा नुकताच पार पडलेल्या लोक अदालतमध्ये तडजोडीत पुन्हा अव्वल ठरला आहे. एक- दोनदा नाहीतर तब्बल सहाव्यांदा महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्याने पहिला क्रमांक पटकावला आहे.

यंदा न्यायालयात प्रलंबित असणारी 30 हजार 510 प्रकरणे निकाली काढली आहेत. एकूण ठेवलेल्या 2 लाख 19 हजार 771 प्रकरणांपैकी 51 हजार 739 प्रकरणे आपापसात तडजोडीने निकाली निघाली आहेत. यामध्ये 179 कोटी 08 लाख 06 हजार 103 एवढ्या रकमेची तडजोड करण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Thane
Kedar Dighe News : ठाणे महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट; केदार दिघेंनी विचारला जाब, म्हणाले...

वैवाहिक वाद प्रकरणात पुनर्मिलन करण्यात यश -

एका वैवाहिक वाद प्रकरणात ज्यात याचिकाकर्ता पती अमेरिकेत वास्तव्यास असून याचिकाकर्त्याने आभासी पध्दतीने (व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे) हजर राहून सुनावणीत भाग घेतला आणि पती व पत्नीमध्ये यशस्वीरित्या समेट घडवून आणण्यात विशेष प्रयत्न करुन दोन्ही पक्षकारांचे वैवाहिक वाद संपवून पुनर्मिलन केले. अशाच प्रकारे एकूण 137 वैवाहिक वाद प्रकरणे निकाली निघाली असून त्यातील 13 प्रकरणातील दुभंगलेल्या संसारास नव्याने पालवी फुटली आहे.

बेलापूर, नवी मुंबई येथे नव्याने स्थापित झालेल्या कौटुंबिक न्यायालयाद्वारे प्रथम लोकअदालतीमध्ये वैवाहिक वादाची 11 प्रकरणे निकाली काढण्यात यश मिळविले असून विशेष म्हणजे त्यातील 7 प्रकरणांत पती-पत्नीचे वैवाहिक वाद संपुष्टात आणून पुनर्मिलन घडवून आणण्यात आले.

Thane
Pratap Sarnaik : महापालिकेच्या अमाप निधीमुळे आव्हाड पुन्हा आमदार; सरनाईकांचा आव्हाडांवर आरोप

मोटार अपघात दाव्यात भरपाई -

मोटार अपघात दावा नुकसान भरपाईतील 329 प्रकरणे निकाली होवून, त्यात 44 कोटींपेक्षा जास्त रक्कमेची तडजोड झाली आहे.

मात्र एकीकडे हे परिस्थिती असताना दुसरीकडे साऱ्या राज्याचा कारभार सांभाळत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातच प्रशासकीय यंत्रणेवर नामुष्कीची वेळ आली आहे. ठाणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न बिकट बनला असून, फेब्रुवारी महिन्याच्या वेतनासह काही महत्त्वाच्या खरेदी पैशांअभावी रखडल्या आहेत. आर्थिक सुस्थितीत असलेल्या ठाणे महापालिकेची आर्थिक स्थिती एवढी बिकट कशी झाली, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com