NCP Sharad Pawar
NCP Sharad PawarSarkarnama

NCP Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मोठी लढाई जिंकली! निवडणूक आयोगाचा पक्ष आणि चिन्हाबाबत मोठा निर्णय

Election Commission Permission to NCP SP : आता या पक्षाला कलम 29 B नुसार देणगी स्वीकारता येणार आहे.
Published on

Maharashtra Political News : लोकसभा निवडणुकीत अत्यंत चांगली कामगिरी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला निवडणूक आयोगाने मोठा दिलासा दिला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाला अधिकृत मान्यता मिळाली आहे.

राज्यात काही महिन्यांवर विधानसभा निवडणुका आल्या आहेत. त्यासाठी पक्षाला निधी उभारण्यासाठी शरद पवार Sharad Pawar गटाच्या वतीने काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाकडे लोकप्रतिनिधी कायदा, 1951 अंतर्गत एक वेगळा राजकीय पक्ष म्हणून नोंदणी करण्याची विनंती केली होती. त्याची सुनावणी सोमवारी (ता.8) झाली.

त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. आता या पक्षाला कलम 29 B नुसार देणगी स्वीकारता येणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाला मोठा दिलासा मिळाल्याचे बोलले जात आहे.

NCP Sharad Pawar
Nana Patole on Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत काँग्रेससोबत होणार दगा फटका? ; पटोले म्हणतात, 'सत्ताधाऱ्यांकडून पुन्हा..'

राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार Ajit Pawar गट हे मूळ पक्ष आणि चिन्हासाठी सुप्रीम कोर्टात गेले आहेत. तेथील निर्णय प्रलंबित असतानाच निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला अधिकृत मान्यता दिली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने दिलेल्या या निर्णय चर्चेचा विषय बनला आहे.

दरम्यान, 6 फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाने विधिमंडळातील संख्याबळानुसार मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चिन्ह अजित पवार गटाला दिले होते. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. त्यानंतर 19 मार्चच्या अंतरिम आदेशात, सुप्रीम कोर्टाने आयोगाला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP-SP) पक्ष आणि तुतारी वाजवणारा माणून या चिन्हाला मान्यता देण्याचे आदेश दिला होता.

त्यानुसार मिळालेल्या मान्यतेनुसार शरदचंद्र पवार पक्षाने लोकसभा निवडणूक लढवली. तर अजित पवार गटाला घड्याळ हे चिन्ह सशर्त वापरावे, अशी सूचना दिलेली आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवारांच्या पक्षाला अधिकृत मान्यताही निवडणूक आयोगाने दिली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

NCP Sharad Pawar
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या पाठिशी उभे राहिले शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद; ‘हिंदू’ विधानावर म्हणाले... 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com