नवी दिल्ली : अभिनेत्री ऐश्वर्या बच्चन (Aishwarya Bacchan) आता सक्त वसुली संचालनालयाच्या (ED) रडारवर आली आहे. चौकशीसाठी हजर राहण्यास तिला ईडीने समन्स बजावले होते. अखेर आज ती चौकशीसाठी ईडीसमोर हजर झाली आहे. परदेशात संपत्ती लपवून ठेवल्याबद्दल तिची चौकशी सुरू आहे. पनामा पेपर्समध्ये तिचे नाव आल्यानंतर ऐश्वर्याच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला आहे.
ऐश्वर्या हिने परदेशात संपत्ती लपवून ठेवल्याचा दावा पनामा पेपर्सच्या हवाल्याने करण्यात आला होता. या प्रकरणी ईडीने तिच्या भोवती आता कारवाईचा फास आवळला आहे. तिला चौकशीसाठी आज समन्स बजावण्यात आले होते. तिने हजर राहण्यास मुदतवाढ मागितल्याची चर्चा सुरवातीला होऊ लागली. मात्र, नंतर ऐश्वर्या थेट ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला.
ऐश्वर्याने 2017 मध्ये परकी चलन विनिमय कायद्यांचा भंग केल्याप्रकरणी ईडी चौकशी करीत आहे. याबाबत ईडीने बच्चन कुटुंबीयांनाही नोटीस बजावली होती. मेगास्टार अमिताभ बच्चन यांची ऐश्वर्याही सून आहे. या प्रकरणी ऐश्वर्याने तिच्याकडील कागदपत्रे आधीच सादर केली होती. आती या प्रकरणात ईडी तिचा जबाब नोंदवत आहे. पनामा पेपर्समध्ये सुमारे 300 भारतीयांची नावे प्रसिद्ध झाली होती. त्यांच्या मागे ईडीचे चौकशीचे शुक्लकाष्ठ लागले आहे.
जॅकलिन अन् नोराचीही चौकशी
दोनशे कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणातील आरोपीकडून कोट्यवधी रुपयांची गिफ्ट स्वीकारणाऱ्या दोन अभिनेत्री आता जाळ्यात अडकल्या आहेत. जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आणि नोरा फतेही (Nora Fatehi) या त्या दोन अभिनेत्री आहेत. आता या प्रकरणात आणखी काही अभिनेत्रींची नावे समोर आली असून, ईडीने त्यांच्याभोवती कारवाईचा फास आवळला आहे. सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) असे या आरोपीचे नाव आहे. तब्बल दोनशे कोटींच्या खंडणी प्रकरणातील तो मुख्य सूत्रधार आहे. आता याच सुकेशने जॅकलिनला भेट म्हणून 52 लाखांचा घोडा आणि 9 लाख रुपयांची पर्शियन मांजर भेट दिल्याचे समोर आले आहे. याचबरोबर त्याने मिनीकूपर कार आणि अनेकवेळा जॅकलिनला महागडे दागिने भेट दिले होते. त्याच्याकडून तिने दीड लाख डॉलरचे कर्जही घेतले होते. अभिनेत्री नोरा फतेही हिला सुकेशकडून एक बीएमडब्लू कार, गुस्सी बॅग, आयफोन दिला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.