Cheating Case: आंध्र'च्या मुख्यमंत्र्यांचे नाव वापरुन माजी क्रिकेटपटूने केली तीन कोटींची फसवणूक

नागराजने फसवणूक केल्याचे लक्षात येताच कंपनीने मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
Cheating Case:
Cheating Case: Sarkarnama

Cheating Case: मुंबई पोलिसांच्या बीकेसी सायबर सेलने आंध्र प्रदेशातील माजी क्रिकेटपटूला फसवणुकीच्या प्रकरणात अटक केली आहे. नागराज बुदुमुरु असे या क्रिकेटपटूचे नाव आहे. त्याने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांचे खाजगी सचिव असल्याची बतावणी करून फसवणूक केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. आरोपी क्रिकेटपटूवर ३० हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

मुख्यमंत्र्यांचे नाव आणि लेटर हेडचा वापर

मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने पकडलेल्या या आरोपीचे नाव नागराज बुदुमुरू असून तो आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यातून क्रिकेट खेळणारा रणजी क्रिकेटपटू आहे. नागराजने फसवणूक करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नावाचा आणि लेटर हेडचा वापर करत होता. धक्कादायक म्हणजे अशा प्रकारे सुमारे ६० कंपन्यांची ३ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. नागराजच्या बँक खात्यातून पोलिसांना ७.६० लाख रुपये मिळाले आहेत.आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा खासगी सचिव असल्याचे सांगत नागराज मोठमोठ्या कंपनीला फोन करून लाखो रुपयांची फसवणूक करायचा.

Cheating Case:
Uddhav Thackeray : मी घरी बसून जे केलं, ते सूरत-गुवाहाटीला जाऊन तुम्हाला जमलं नाही; ठाकरेंचा शिंदेना टोला

राज्यातील गरीब क्रिकेटपटूंना स्पॉन्सरशिप देण्याच्या नावाखाली तो कंपनीकडे लाखो रुपयांची मागणी करून पैसे उकळत होता.कंपनीचा विश्वास जिंकण्यासाठी तो आंध्र प्रदेश सरकारच्या अधिकृत ईमेल आयडी सारख्या ईमेल आयडीवरून मेल पाठवत असे आणि आंध्र प्रदेश सरकारच्या बनावट लेटरहेडवर पत्रेही देत ​​असे. अशी माहिती मुंबई पोलिस सायबर सेलचे डीसीपी बालसिंग राजपूत यांनी दिली आहे.

सनरायझर्स हैदराबाद संघात समावेश होता

नागराजने क्रिकेटर्सचे किटसाठी मुंबईतील एका इलेक्ट्रॉनिक उपकरण कंपनीच्या एमडीकडे 12 लाख रुपयांची मागणी केली होती. नागराजने आंध्र क्रिकेट असोसिएशनच्या नावाने कंपनीला बनावट कागदपत्रे आणि ई-मेल आयडीही दिला. नागराजने फसवणूक केल्याचे लक्षात येताच कंपनीने मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली. नागराजवर आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये जवळपास ३० गुन्हे दाखल आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com