Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama

Uddhav Thackeray : मी घरी बसून जे केलं, ते सूरत-गुवाहाटीला जाऊन तुम्हाला जमलं नाही; ठाकरेंचा शिंदेना टोला

Mahavikas Aghadi : ''एवढी लाचारी मी कधी पत्करली नाही...''
Published on

Mumbai : मी घरी बसून जे केलं ते सूरत- गुहावाटीला जाऊन तुम्हाला जमलं नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला. आज मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी ठाकरे बोलत होते.

ठाकरे म्हणाले, ''सध्या भाजपमध्ये जा किंवा थेट तुरुंगात जा अशी परिस्थिती देशात सुरू आहे. पत्रकारांच्या हातात नेहमी कलम असायला हवं. मात्र, सध्या अनेक पत्रकारांच्या हातात कमळ दिसत आहे. आता सर्वोच्च न्यायालयाकडून आम्हाला शेवटची आशा आहे''.

''लोकशाही टिकवायची असेल तर सर्वसामान्य जनतेलाही पुढं यावं लागणार आहे. ही लढाई फक्त शिवसेनेची (ठाकरे गट) नाही. तर आपल्या सर्वांची आहे'', असं ते म्हणाले.

Uddhav Thackeray
Ajit Pawar: "ऊन, पाऊस, वादळ आलं तरी सभा होणारच ! पावसातील सभा तर आपल्याला फायद्याच्याच"

''भाजपने शिवसेनेचा वापर करुन घेतला. वापर करा आणि फेका ही निती भाजपची आहे. आमच्या हिंदुत्वावर बोलता मग भाजपने हिंदुत्व कधी स्वीकारलं होतं? ममता बॅनर्जींचा पाठिंबा घेतला तेव्हा कुठे गेलं होतं तुमचं हिंदुत्व?''

''काँग्रेससोबत जाऊन आम्ही हिंदुत्व सोडलं असं म्हणता मग काश्मीरमध्ये मुफ्तींसोबत जाऊन तुम्ही काय केलं? तेव्हा कुठं होतं तुमचं हिंदुत्व?'' असा घणाघात ठाकरेंनी केला.

''देशाला दिशा दाखविण्याची वेळ महाराष्ट्रावर आली आहे. लोकशाहीचे स्तभं डळमळीत झाले आहेत. आता फक्त सर्वोच्च न्यायालय राहिलं आहे. तोच आशेचा किरण आहे. न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी असली तरी ती लोकशाहीचं वस्त्रहरण होऊ देणार नाही'', असं ते म्हणाले.

Uddhav Thackeray
Supreme Court : सत्तासंघर्षावर उद्या पुन्हा सुनावणी; कपिल सिब्बल युक्तीवाद करणार...

''दुसरं कोणी सांगितलं म्हणून भूमिका घेणारा मी नाही. कल्याण पालिकेच्या सभेच्या वेळी शिवसेना-भाजपचं सरकार होतं. त्या सभेत याच माणसाने नाटक केलं होतं. भाजप शिवसैनिकांवर अन्याय करत आहे''.

''हे मी उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही, अशी तक्रार केली होती. त्यावेळी भाजप अन्याय करत होतं. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आल्यावर ते अन्याय करतात, मग तुम्हाला नेमकं काय हवं? असं म्हणत ज्यांना जायचं त्यांनी निघून जा. ज्यांना थांबायच ते थांबा. एवढी लाचारी मी कधी पत्कारली नाही'', असा हल्लाबोल ठाकरेंनी शिंदेवर केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com