भाजप-शिवसेना संघर्ष तीव्र; राणेंप्रमाणे आशिष शेलार यांनाही अटक होणार?

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी शेलार यांच्या वक्तव्याबद्दल मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र दिले होते.
Ashish Shelar, kishori pedanekar
Ashish Shelar, kishori pedanekar Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : वरळीतील बीडीडी चाळीतील गॅस सिलिंडर स्फोटात चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. यावरुन भाजप आणि शिवसेनेमध्ये (Shiv Sena) चांगलाच वाद रंगला आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्याबद्दल भाजप (BJP) नेते आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी अपशब्द वापरल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

आशिष शेलार यांच्या विरोधात पेडणेकर यांनी तक्रार दाखल केली होती. पेडणेकर यांनी तक्रारीवरुन शेलार यांच्या विरोधात मरिन लाईन्स पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. शेलार यांच्यावर गुन्हा दाखल करा या मागणीवर महापौर ठाम होत्या. त्यानुसार पोलिसांनी शेलार यांच्यावर IPC कलन 354 नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे शेलार यांच्या अडचणी वाढल्या आहेत. शेलार यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नंतर महाविकास आघाडीचा भाजपला हा दूसरा धक्का असल्याचे सांगितले जात आहे. नारायण राणे यांच्या प्रमाणेच पोलिस आशिष शेलार यांचीही उचलबांगडी करण्याची शक्यता आहे.

Ashish Shelar, kishori pedanekar
आशिष शेलार अडचणीत; 'त्या' वक्तव्याची महिला आयोगाने घेतली गंभीर दखल!

दरम्यान, आशिष शेलार यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये शेलार म्हणाले, सत्ताधारी पक्षाच्या दबावामुळे मुद्दाम गुन्हा दाखल केला जात असल्याचे म्हटले आहे. आपण जे विधान केले नाही. त्याचा विपर्यास करत मुद्दाम गुन्हा दाखल केला, असा आरोप शेलार यांनी पत्रात केला आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी शेलार यांच्या वक्तव्याबद्दल मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र दिले होते. त्यामध्ये चाकणकर म्हणाल्या, जबाबदार लोकप्रतिनिधींनी महिलांच्या संदर्भात केलेली कोणतीही अवमानकारक वक्तव्य अजिबात खपवून घेतली जाणार नाहीत. त्यामुळे राज्य महिला आयोगाने याची गंभीर दखल घेत यासंदर्भातील वस्तुस्थितीदर्शक अहवाल आयोगाला पाठवून देण्याचे निर्देश मुंबई पोलिस आयुक्तांना दिले होते. किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल बोलताना शेलार यांनी अत्यंत बेताल वक्तव्य केल्याचे समाजमाध्यमातून प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आले, असे चाकणकर म्हणाल्या होत्या.

Ashish Shelar, kishori pedanekar
परिचारक-आवताडे यांच्यात वादाची ठिणगी : उद्घाटन कार्यक्रमात डावलले

शेलार यांच्या विरोधात शिवसेना महिला आघाडीनेही कायदा सुव्यवस्था सहआयुक्त विश्वास नागरे पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. तसेच शेलार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेने केली होती. या संदर्भात नगरसेविका विशाखा राऊत, उपनेत्या मीना कांबळे तसेच मुंबईतील सर्व महिला विभाग प्रमुख खांनी शेलार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com