मुंबई : एनसीबीचे (Narcotics Control Bureau)माजी मुंबई विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. ठाणे (Thane) शहरातील कोपरी पोलीस स्टेशनमध्ये (Kopari Police Station) त्यांच्याविरोधात गुन्हा (FIR) नोंदवण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून (State Excise Department)यापूर्वी समीर वानखेडे यांना कारणे दाखवा नोटीस बाजवली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. वयाच्या 17 व्या वर्षी आपल्या नावावर बार परवाना घेतल्याचा आरोप वानखेडेंवर आहे.
वानखेडेंविरोधात कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.खोटी माहिती देऊन समीर वानखेडे यांनी मद्य विक्रीचा परवाना (Liquor sales license) मिळवला असल्याची तक्रार पोलिसांत दाखल आहे.
राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आरोप केला होता की, त्यांनी हा परवाना घेतला तेव्हा त्यांचे 18 वर्षांपेक्षा कमी होते. त्यानंतर या तक्रारीवर जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी सुरु होती.
या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने आपला अहवाल जिल्हा दंडाधिकारी (DC) यांना सादर केला. ज्याच्या सुनावणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी कलम 54 अन्वये कारवाई करुन परवाना रद्द केला.
''समीर वानखेडेंचे वडील उत्पादन शुल्क विभागात काम करत होते. त्यामुळे त्यांनी एका अल्पवयीन मुलाला बारचं परमीट दिलं. हा सर्वात मोठा फर्जीवाडा आहे,'' असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. नवी मुंबईतील वाशी येथे समीर वानखेडे यांच्या नावावर एक बार आहे. या बारसाठी १९९६ ते ९७ या काळात खोटी माहिती देऊन परवाना मिळविला होता.
समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे हे 1997 मध्ये उत्पादन शुल्क कार्यालयात नोकरीला होते. त्यावेळी त्यांनी समीर वानखेडेंच्या नावावर बारचं परमीट काढले होते. त्याची नोंद ठाणे जिल्ह्याच्या रजिस्टरमध्ये नोंद आहे. समीर ज्ञानदेव वानखेडे या नावाने हे परमीट घेण्यात आले. त्यावेळी समीर यांचं वय होतं 17 वर्ष 10 महिने आणि 19 दिवस होते.
काही दिवसांपूर्वीच ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी वानखेडे यांच्या नवी मुंबईतल्या बारचा परवाना रद्द केला होता. बार परवाना घेण्याच्या वेळी वय कमी असल्याने राजेश नार्वेकर यांच्या आदेशाने समीर वानखडे यांच्या वाशी येथील सतगुरु बारचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्यात आला आहे. राजेश नार्वेकर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत याचे व्याही आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.