Maharashtra Politics: अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलीच कॅबिनेट बैठक; सरकारने घेतले 'हे' आठ मोठे निर्णय

Ajit Pawar News: अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राज्यमंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

NCP Pune : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी अजित पवार यांच्यासह एकूण नऊ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर अवघ्या ४८ तासातच राज्यमंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली.

या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आदी मंत्री उपस्थित होते. यावेळी राज्यमंत्रिमंडळाच्या या बैठकीत आठ मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.

Ajit Pawar
Maharashtra Cabinet Expansion: राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार?; मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले संकेत

यावेळी मराठा, कुणबी विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षणासाठी सयाजीराव गायकवाड-सारथी शिष्यवृत्ती योजना जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे मराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी हा मोठा दिलासा असणार आहे. या बरोबरच राज्याचे ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते निर्णय झाले?

- राज्याचे ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

- मराठा, कुणबी विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षणासाठी 'सयाजीराव गायकवाड - सारथी शिष्यवृत्ती' योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना या निर्णयाचा मोठा लाभ मिळणार आहे.

- दिंडोरी तालुक्यातील चिमणपाडा आणि त्र्यंबक तालुक्यातील कळमुस्ते येथील प्रवाही वळण योजनांना मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- नागपूर येथील मे.शिवराज फाईन आर्ट लिथो वर्क्सच्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याबाबत देखील महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

Ajit Pawar
Congress Party Meeting: राजकीय घडामोडींना वेग : काँग्रेसने बोलवली तातडीची बैठक; विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेस दावा करणार?

- सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती, न्यायमूर्ती किंवा त्यांचे पती, पत्नी यांना सेवानिवृत्तीनंतरचे लाभ देण्याबाबतचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली, गेळे आणि चौकुळ येथील कबूलायतदार गावकर जमिनीबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

- नागपूर कृषी महाविद्यालय येथे आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्राबाबतही महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

- मत्स्यबीज उत्पादन आणि मत्स्यबीज संवर्धन केंद्रांचा भाडेपट्टी कालावधी वाढवून आता २५ वर्षे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com