Ranjit Shirole, Bala Shedge, Ganesh Satpute
Ranjit Shirole, Bala Shedge, Ganesh SatputeSarkarnama

MNS News : शिरोळे,सातपुते, शेडगे यांच्यासह पाचजण मनसेचे नवे सरचिटणीस

Maharashtra Politics : मनसेच्या १७ वर्षांच्या वाटचालीनंतर नियुक्त्या
Published on

Raj Thackeray : गुढीपाडव्यानिमित्त आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेकडे राज्याचे लक्ष लागले होते. शिवतिर्थावर त्यांच्या सभेची जय्यत तयारी झालेली आहे. तेथे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या सभेत मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. त्यात पुण्यातील तीन पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या उपस्थित आज पक्षातील काही प्रमुख नेत्यांवर जबाबदारीची पदे देण्यात आली. मनसेच्या १७ वर्षांच्या वाटचालीनंतर या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यात पुण्यातील बाळा शेडगे, गणेश सातपुते, रणजित शिरोळे यांचा समावेश आहे. या सभेत संदीप देशपांडे (Sandip Deshpande) यांची नेतेपदी निवड करण्यात आली. अविनाश जाधव आणि विदर्भातील उपाध्यक्ष राजीव उंबरकर यांच्याकडेही नेतेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Ranjit Shirole, Bala Shedge, Ganesh Satpute
Chandrashekhar Bawankule News : संजय राऊतांनी कधीतरी चांगले बोलावे, त्यांचं ऐकलं जाईल !

चित्रपटसेनेचे अमेय खोपकर, योगेश परुळेकर, बाळा शेडगे, गणेश सातपुते, रणजित शिरोळे यांच्याकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आल्या आहेत. नाशिकच्या उपाध्यक्षपदी पराग क्षिंत्रे यांची निवड करण्यात आली आहे. या सर्वांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात आली.

दरम्यान, अॅडगुरू अशी ओळख असेले भरत दाभोळकर (Bharat Dabholkar) यांनी मनसेत प्रवेश केला. यावेळी त्यांनी समोरील जनसागर पाहून बाळासाहेबांची आठवण झाल्याचे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com