Uddhav Thackeray Mumbra Visit: 'पोलिसांनी बाजूला व्हावं, आम्ही यांना बघतो..'; ठाकरेंचा शिंदे गटाला थेट इशारा

Uddhav Thackeray and Shinde group: उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: मुंब्य्रातील शिवसेनेच्या शाखेवरून शिंदे गट आणि ठाकरे गट समोरासमोर आले असून, मुंब्रा येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेवर बुलडोझर फिरवण्यात आल्यानंतर दोन्ही गटांत तणाव निर्माण झाला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारी स्वत: मुंब्य्रातील शाखेला भेट देण्यासाठी गेले असता, त्यांना पोलिसांनी रोखले. त्यामुळे काही वेळ तेथे तणाव पाहायला मिळाला.

यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. "पोलिसांची हतबलता महाराष्ट्राने पाहिली असून, पोलिसांना चोरांचे संरक्षण करावं लांगतंय, अशी नामुष्की महाराष्ट्रावर याआधी कधी आली नाही, गद्दारांना सत्तेचा माज आला आहे. पोलिसांना चोरांचे रक्षण करायला लावलं, यांना सत्तेची मस्ती चढली आहे, पोलिसांनी बाजूला व्हावं, आम्ही यांना बघतो..", अशा कडक शब्दांत ठाकरेंनी शिंदे गटाला इशारा दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : ''सत्तेचा माज आलेल्यांनी बुलडोझर लावून शिवसेनेची शाखा पाडली, निवडणुका येऊद्या...'' ; उद्धव ठाकरेंचा इशारा!

"मी मुद्दाम मुंब्य्रात आलो, हे सर्व नेभळट आहेत. शिवसेनेची शाखा जिकडे आहे, तिकडेच राहील, आमची शाखा तिथेच राहणार, पोलिसांनी फक्त बाजूला व्हावं, आम्ही पाहून घेतो, शिवसेना एकच आणि ती आमचीच, खरं तर घुसखोरीची केस शिंदे गटावर झाली पाहिजे, नोटिशीशिवाय कार्यालय पाडलं, ही शाखा कोणी पाडली, प्रशासनाने पाडली का तर नाही, दोन दिवसांनंतर तिथे आमची शाखा असणार दिवाळी जाऊदे..", असा थेट इशारा ठाकरेंनी शिंदे गटाला दिला आहे.

"मी दोन दिवसांपूर्वी जाहीर केले होते की, येथे येणार आहे, पण यथे भाडोत्री गुंड आणून बसवले आहेत, आता त्यांना पोलिसांचे संरक्षण दिले आहे, मी पोलिसांना आव्हान करतो की, तुम्ही बाजूला व्हा, आम्ही यांना बघतो", असा थेट इशाराच ठाकरेंनी शिंदे गटाला दिला. त्यामुळे आता यावर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणं महत्अत्वाचं सणार आहे.

Edited by : Ganesh Thombare

Uddhav Thackeray
Loksabha Election : भाजप-शिंदे गटात वाद; बुलडाणा मतदारसंघावरून संजय गायकवाडांचा भाजपला इशारा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com