Bhagatsingh Koshyari News: भगतसिंह कोश्यारी मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला; कारण काय?

Eknath Shinde: भगतसिंह कोश्यारी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी 'वर्षा'वर दाखल
Bhagatsingh Koshyari News:
Bhagatsingh Koshyari News:Sarkarnama

Mumbai News: महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. भगतसिंह कोश्यारी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी 'वर्षा'वर दाखल झाले आहेत.

भगतसिंह कोश्यारी हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीला गेल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. कोश्यारी हे अचानक मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला का गेले? त्यांच्या भेटीदरम्यान नेमकं काय चर्चा होणार?, असे अनेक सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहेत.

Bhagatsingh Koshyari News:
Shrigonda News: मी मैत्री जपली; पण राहुल जगतापांनी गद्दारी केली, करारा जवाब मिलेगा : साजन पाचपुतेंचा जगतापांना इशारा

सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल काही दिवसांपूर्वी दिला. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने कोश्यारी यांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले होते. त्यानंतर आता कोश्यारी हे मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेत आहेत. त्यामुळे त्यांच्या या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Bhagatsingh Koshyari News:
Indapur Politic's : आमच्यावर शंभर गुन्हे दाखल झाले तरी चालतील; पण ‘त्यांना’ राजकीय परिणाम भोगावे लागतील : आप्पासाहेब जगदाळेंचा इशारा

दरम्यान, भगतसिंह कोश्यारी हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात चांगलेच चर्चेत होते. त्यावेळी अनेकवेळा महाविकास आघाडी सरकारबरोबर त्यांचे खटके उडाले होते. त्यानंतर ते आपल्या वादग्रस्त वक्तव्यांवरुन चर्चेत आले होते. त्याचबरोबर राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दाही त्यांच्या समोर होता.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com