Devendra Fadnavis News : आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा तापलेला असतानाच कोश्यारींनी घेतली फडणवीसांची भेट; चर्चांना उधाण

Shiv Sena MLA disqualification case : राज्यात शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा तापलेला आहे.
Bhagat Singh Koshyari, Devendra Fadnavis News
Bhagat Singh Koshyari, Devendra Fadnavis NewsSarkarnama

Mumbai News : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची सागर या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. राज्यातील सत्ता संघर्षात कोश्यारी यांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. आता राज्यात शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा तापलेला असताना पुन्हा कोश्यारी यांनी फडणवीसांची भेट घेतली, त्यावरुन राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

कोश्यारी यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून भूमिका वादग्रस्त ठरली होती. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने विधान परिषदेवर नियुक्ती करण्यासाठी 12 जणांची नावे कोश्यारी यांच्याकडे पाठवली होती. त्यांनी त्या नावांना संमतीच दिली नाही. त्यावरून ठाकरे सरकार आणि त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले या महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर टीका झाली होती.

Bhagat Singh Koshyari, Devendra Fadnavis News
Eknath Shinde news : 'हे तर हिंदुत्वाचे मिलावट राम' ; मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर जळजळीत टीका

विरोधी पक्षांनी भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर महाराष्ट्रात झालेल्या सत्तासंघर्षामध्येही त्यांच्यावर आरोप झाले होते. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर ठाकरे सरकारला बहुमताची चाचणी करण्याचे निर्देश कोश्यारी यांनी दिले होते. त्यावरुन सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) झालेल्या सुनावणी दरम्यान, त्यांची भूमिका योग्य नसल्याचे न्यायालयाने म्हटले होते. तसचे त्यांच्यावर कठोर शब्दात ताशेरे ओढले होते. त्यामुळे संपूर्ण राज्यातून त्यांच्यार टिकेचा भडीमार झाला होता.

या सगळ्या प्रकरणानंतर कोश्यारी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून हटवण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी आता मुंबईत येवून फडणवीस यांची भेट घेतल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. फडणवीस आणि कोश्यारी यांच्या भेटीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ही भेट नेमकी कशासाठी झाली यावरून चर्चा सुरू आहेत.

या भेटीबद्दल फडणवीस यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज सागर निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. फडणवीस यांनी या भेटीला सदिच्छा भेट म्हटले आहे. मात्र, आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्यावरून सर्वोच्च न्यायालायने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर ताशेरे ओढलेले असतानाच ही भेट झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Bhagat Singh Koshyari, Devendra Fadnavis News
Nagar Urban Bank News : मंत्री, खासदार, आमदारांनी बँक बुडवणाऱ्यांना जवळ करू नये; 'नगर अर्बन'च्या ठेवीदारांचा इशारा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com