राजेंद्र त्रिमुखे :
Ahmednagar Farmer News : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40 टक्के निर्यात कर लावल्याने राज्यात विशेष करून कांदा पट्टा असलेल्या नाशिक, नगर, पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून तीव्र प्रतिक्रिया येत आहे. आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांची भूमिका पाहून केंद्र सरकारने 2 लाख मेट्रिक टन कांदा नाफेडच्या माध्यमातून प्रति क्विंटल 2,410 रुपयाने खरेदी करण्याची घोषणा केली आहे. मात्र सरकारच्या या घोषणेबद्दल किसान सभेने असमाधान व्यक्त केल्यामुळे कांदाप्रश्न सरकारला रडवणार, असे बोलले जात आहे.
शेतकऱ्यांकडे आजमितीला 40 लाख मेट्रिक टन कांदा निर्यातीसाठी पडून आहे. अशी स्थिती असतानाही एकीकडे निर्यात कर लावलेली आहे, तर दुसरीकडे निर्यात थांबवून केवळ 2 लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी करण्याची घोषणा झाली आहे. यामुळे फार काही मोठे केल्याचे दाखवणे, हा या समस्येवर उपाय नसल्याचे शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांनी म्हंटले आहे.
याबाबत अजित नवले यांनी दोन लाख टन खरेदीचा सरकारचा निर्णय म्हणजे तात्पुरता उपाय आहे. मात्र शेतकऱ्यांकडे 40 लाख टन कांदा पडून आहे. विदेशात कांद्याला मागणी असताना जर का 40 टक्के निर्यात कर मागे घेतले गेले तर, शेतकऱ्यांच्या खिशात दोन अधिकचे पैसे पडणार आहेत. त्यामुळे निर्यात कर रद्द करून कांद्याला सरकारने योग्य भाव देणे, हाच कांदा प्रश्नावर योग्य मार्ग असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
'सरकारने केवळ 2 लाख टन कांदा खरेदी बद्दल नवले यांनी टीका करतानाच, गेली तीन वर्षे कांद्याला भाव नाही, अतिवृष्टीमुळे कांद्याचे मोठे नुकसान झाले. त्यासाठी घोषित अनुदानाचे पैसे अजून शेतकऱ्यांच्या खात्यात आलेले नाहीत. या परिस्थितीत आता कुठे शेतकऱ्याला चांगला भाव मिळू लागताच, केंद्र सरकारने निर्यात कर लावला. यामागे सरकारची शेतकरीविरोधी असलेली भूमिका पुन्हा पुढे आली असल्याची टीका,' डॉ.अजित नवले यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.