Dombivli News: बाप्पाच्या प्रतिष्ठापनेला काही तास उरले असतानाच डोंबिवलीकरांवर आलं विघ्न!

Ganeshotsav 2025 Dombivli Devotees Trouble:डोंबिवलीतले अनेक गणेशभक्त संकटात सापडलेत आहे, याचे कारण समोर आले आहे. ज्या मूर्तिकाराकडे पैसे देऊन गणेशभक्तांनी मूर्ती बुक केल्या होत्या. तो मूर्तीकार पळून गेला असल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीत घडला आहे.
Ganeshotsav Festival
Ganeshotsav Festivalsarkarnama
Published on
Updated on

Dombivli News:अनेक दिवस गणरायाची आगमनाची आस लागलेल्या गणेश भक्तांचा उत्साह शिगेला पोहचला आहे. बाप्पाच्या स्वागताची तयारी पूर्ण झाली आहे. अवघे काही तास बाप्पाच्या प्रतिष्ठापनेला उरलेले असताना डोंबिवलीमध्ये काही गणेशभक्तांवर 'विघ्न'ओढवलं आहे. त्यामुळे डोंबिवलीकर सध्या चिंतेत सापडले आहेत.

डोंबिवलीतले अनेक गणेशभक्त संकटात सापडलेत आहे, याचे कारण समोर आले आहे. ज्या मूर्तिकाराकडे पैसे देऊन गणेशभक्तांनी मूर्ती बुक केल्या होत्या. तो मूर्तीकार पळून गेला असल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीत घडला आहे.

अवघे काही तास बाप्पाच्या प्रतिष्ठापनेला उरलेले असताना हा प्रकार घडलामुळे गणेश भक्तांना आता अन्य ठिकाणी मूर्ती घेण्यासाठी धावाधाव सुरु झाली आहे. डोंबिवली पश्चिममध्ये 'आनंदी कलाकेंद्र'तील कार्यशाळेत हजारो डोंबिवलीकरांनी दोन-तीन महिन्यांपूर्वी पैसे देऊन मूर्ती बुक केल्या आहेत.

गेले काही दिवस हे सर्व नागरिक त्या मूर्तिकाराला फोन करीत आहेत, पण त्याचा फोन बंद आहे. त्यानंतर त्रस्त झालेले अनेक जण आनंदी कलाकेंद्रात गेले असता त्यांना तेथे कोणीही आढळले नाहीत. आज मूर्ती घेण्यासाठी अनेक जण आनंदी कलाकेंद्रात गेले, त्याठिकाणी काही मूर्ती तयार आहेत तर काही मूर्तीचे रंगकाम किंवा इतर कामही बाकी आहेत.

Ganeshotsav Festival
konkan News: बाप्पाच्या आगमनात खराब रस्त्याचे विघ्न! महाविकास अन् महायुती एकाच माळेचे मणी; 17 वर्षांपासूनचं स्वप्न अपूर्णच

ज्या मूर्तिकाराकडे नागरिकांनी मूर्ती बूक करुन आगाऊ पैसे दिले होते तो मूर्तिकार गायब असल्याचे नागरिकांनी सांगितले. प्रतिष्ठापनेचा काही तास उरले असताना हा प्रकार घडल्याने गणेश भक्त हताश झाले असून अन्य ठिकाणी मूर्ती घेण्यासाठी जात आहेत.

दुसरीकडे गौरी-गणपतीसाठी गावाकडे निघण्यासाठी भाविकांनी एसटी स्टॅड, रेल्वे स्थानकावर गर्दी होत आहे.तळकोकणात एक दिवस आधीच गणपतीचे आगमन होत असते. कोकणात सध्या भातशेती बहरली असून याच शेतीतून वाट काढत बाप्पाला वाजत-गाजत घरी आणले जात आहे. विविध मार्गानी राज्यातून कोकणवासीय आपल्या घराकडे आले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर मात्र खराब रस्त्यामुळे त्रास सहन करीत खड्यांचे अडथळे पार करीत घरी दाखल होत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com