Ganpat Gaikwad Firing : पोलिसांनी गोळीबार प्रकरणाची माहिती विधानभवनाला दिली; कारवाई होणार ?

BJP MLA Ganpat Gaikwad News : आमदार गणपत गायकवाड यांच्या निवासस्थानबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
Mla ganpat Gaikwad
Mla ganpat Gaikwad Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : कल्याण जवळील द्वारली गाव हद्दीतील जमिनीचा वाद सामोपचाराने मिटविण्यासाठी हिललाईन पोलीस ठाण्यात भाजप आमदार गणपत गायकवाड आणि प्रतिस्पर्धी शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यासह त्यांचे समर्थक बसले होते. त्याचवेळी अचानकपणे गणपत गायकवाड यांनी जवळील रिव्हाॅल्व्हरमधून महेश यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर गोळीबार केला. या घटनेचा संपुर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचे चित्रीकरण समाज माध्यमांवर प्रसारित झाल्याने खळबळ उडाली आहे.

हिललाईन पोलीस ठाण्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबार प्रकरणाची संपूर्ण माहिती पोलिसांनी विधान भवनाला दिली आहे. आमदार गायकवाड यांनी निशाणा साधून गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली असून या माहितीला सीसीटीव्ही चित्रणामुळे आणखी दुजोरा मिळाला आहे.

Mla ganpat Gaikwad
Ajit Pawar on Poonam Pandey Death : पूनम पांडेचा मृत्यू; अजितदादांकडून सभेत उल्लेख अन्‌ उपमुख्यमंत्र्यांवर ओढावली नामुष्की!

हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या दालनात शिवसेनेचे महेश पाटील, राहुल पाटील बसले होते. त्यांच्या समोरील बाजूस पोलीस अधिकाऱ्याच्या बाजुला आमदार गायकवाड हे बसले होते. त्याचवेळी दालनाच्या नागरिकांचा बाहेर ओरडा सुरू होता. तो शांत करण्याचे आवाहन पोलीस अधिकारी करत होते. त्याचवेळी हा प्रकार घडल्याचे पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांनी सांगितले.

त्यासोबतच भाजप (Bjp) आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांच्या निवासस्थानबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता पोलिसांकडून घेतली जात आहे. आमदार गायकवाड यांच्या संपर्क कार्यालयाबाहेरही पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पोलीस ठाण्यात भाजपच्या सत्ताधारी आमदाराने गोळीबाराचा प्रकार केल्याने राज्यभर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ज्याने कायद्याचे पालन करायचे तोच रिव्हाॅल्व्हरने गोळीबार करत असेल तर सामान्य जनतेने न्याय मागायचा कोणाकडे, असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहे.

दरम्यान, पोलिसांनी या संपूर्ण गोळीबार प्रकरणाची माहिती विधान भवनाला दिली आहे. त्यामुळे येत्या काळात विधानभवनाकडून आमदार गणपत गायकवाड यांच्यावर काय कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यासोबतच येथील पोलीस अधीक्षकांनी या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल गृहविभाग व राज्य सरकारला पाठविला आहे.

महेश गायकवाड व इतरांवर भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी केलेला गोळीबार हा स्वसंरक्षणार्थ नसून खुनाच्या हेतूने केल्याची खळबळजनक माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांनी दिली आहे. त्यांच्या विधानामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे.

Mla ganpat Gaikwad
Ganpat Gaikwad Firing : खुनाच्या हेतूनेच गायकवाडांकडून गोळीबार ; अतिरिक्त पोलिस आयुक्तांची माहिती

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com