Parag Shah : सर्वात श्रीमंत उमेदवार पराग शाह प्रचारापासून काही दिवस राहणार अलिप्त; नेमकं काय घडलं

Ghatkopar East Assembly Election 2024:पराग शाह यांच्या डाव्या पायाच्या हाडाला दुखापत झाल्याचे वैद्यकीय तपासणीत आढळले आहे. घरीच राहून आराम करण्याचा सल्ला पराग शाह यांना त्यांच्यावर उपचार करण्याऱ्या डॉक्टरांनी दिला आहे.
Parag Shah
Parag ShahSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Elections 2024: मनसेचे शिवडी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बाळा नांदगावकर यांच्या पायालाही आठ दिवसांपूर्वी प्रचार करताना दुखापत झाली आहे. त्यानंतर आता भाजपचे मुंबईतील घाटकोपर पूर्व विधानसभा (Ghatkopar East Vidhan Sabha) मतदारसंघातील भाजपचे उमेदवार पराग शाह (Parag Shah) यांच्या पायाला दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे.

गेल्या मंगळवारी पराग शाह त्यांच्या घरी पाय घसरुन पडले होते. यानंतर त्यांना तातडीने डॉक्टरांकडे नेण्यात आले. त्यावेळी पराग शाह यांच्या डाव्या पायाच्या हाडाला दुखापत झाल्याचे वैद्यकीय तपासणीत आढळले आहे. घरीच राहून आराम करण्याचा सल्ला पराग शाह यांना त्यांच्यावर उपचार करण्याऱ्या डॉक्टरांनी दिला आहे.

Parag Shah
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : शिंदेंचा ठाकरेंना मराठवाड्यात 'जोर का झटका'; 'या' वजनदार नेत्यानं निवडणुकीच्या तोंडावर साथ सोडली

राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार असणारे भाजपचे नेते, घाटकोपर पूर्व विधानसभेचे उमेदवार सध्या दुखापत झाल्यामुळे प्रचार करु शकत नाही, असे त्यांच्या निकटवर्तीय यांनी सांगितले. बाळा नांदगावकर यांनीही चार दिवस प्रचारातून विश्रांती घेतली होती. त्यानंतर आता बाळा नांदगावकर हे व्हिलचेअरवर बसून शिवडीत प्रचार करताना दिसत आहेत.

Parag Shah
Maratha Politics : मराठा मतदारांचा 'फेव्हरेट' पक्ष कोणता? आकडेवारीमुळं सगळीच गणितं 'फेल'

पराग शाह यांना आराम करीत करीत असल्याने आता भाजपचे कार्यकर्तेच प्रचार करताना दिसत आहे. शाह यांच्यासमोर शरद पवार गटाच्या राखी जाधव आणि मनसेच्या संदीप कुलथे यांचे आव्हान आहे. राखी जाधव या आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जातात. गुजरातीबहुल परिसर म्हणून हा मतदारसंघ ओळखला जातो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com