Ghatkopar Hoarding Case : मोठी बातमी! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनाप्रकरणी आयपीएस कैसर खलिद निलंबित

Quaiser Khalid : जाहिरात एजन्सी, होर्डिंग लावणारी कंपनी आणि आयपीएस कैसर खलिद यांच्या पत्नीचा व्यावसायिक भागीदार अर्शद खान यांच्यात काही आर्थिक व्यवहार आढळून आले आहेत.
Quaiser Khalid
Quaiser KhalidSarkarnama

Mumbai News : मुंबईतील घाटकोपरमधील महाकाय होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातात 17 लोकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर एका महिन्यानंतर राज्य सरकारने मंगळवारी (ता. 25) पीसीआरचे अतिरिक्त महासंचालक कैसर खलिद यांना निलंबित केले. त्यांनी संबंधित मर्यादेपेक्षा जास्त मोठे असलेले होर्डिंग्ज लावण्याची परस्पर परवानगी दिल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

अधिक माहितीनुसार, इगो मीडिया जाहिरात एजन्सी, होर्डिंग लावण्यासाठी जबाबदार असलेली कंपनी आणि आयपीएस अधिकारी कैसर खालिद यांच्या पत्नीचा व्यावसायिक भागीदार अर्शद खान यांच्यात काही आर्थिक व्यवहार आढळून आले आहेत. त्यासाठी 10 हून अधिक खाती वापरण्यात आली होती. त्यातून सुमारे 46 लाख रुपयांचा व्यवहार झाल्याचे गुन्हे शाखेतील वरिष्ठ सूत्रांनी स्पष्ट केले.

या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने 15 दिवसांपूर्वी अर्शद खानची चौकशी केली होती. मात्र तपास अद्याप प्राथमिक अवस्थेत असल्याने त्यांच्याकडून फारशी माहिती मिळाली नाही. आता, तपास प्रगतीपथावर असल्याने, गुन्हे शाखा अर्शद खानला कोणत्याही वेळी पुढील चौकशीसाठी नोटीस पाठवण्याची शक्यता आहे.

हे प्रकरण यापूर्वी 17 मे रोजी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले होते. त्याची व्याप्ती लक्षात घेऊन तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. पेट्रोल पंपावर कोसळलेले होर्डिंग उभारणाऱ्या इगो मीडिया जाहिरात एजन्सीचा संचालक भावेश भिंडे याला स्थानिक न्यायालयाने 26 मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवल्यानंतर ही घटना घडली आहे. आयपीसी कलम 304 अन्वये हत्येचा गुन्हा दाखल असलेल्या भिंडेला 16 मे रोजी जयपूरमध्ये अटक करण्यात आली होती.

Quaiser Khalid
Rahul Gandhi is Leader of Opposition : राहुल गांधींची लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड; I.N.D.I.A आघाडीकडून शिक्कामोर्तब!

नेमके काय झाले होते ?

मुंबईतील घाटकोपर परिसरात 13 मे रोजी जोरदार वाऱ्यामुळे एक भले मोठे होर्डिंग पेट्रोलपंपावर कोसळले. त्यात 16 जणांचा मृत्यू झाला होता, तर 75 जण जखमी झाले होते. या घटनेची दखल घेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे 'दुर्दैवी' असल्याचे म्हटले आणि मुंबईतील अशा सर्व होर्डिंगचे ऑडिट करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यांनी पीडितांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com