State Government Employees
State Government Employees Sarkarnama

Government Employees: सरकारी कर्मचारी मदतीसाठी पुढे; मुख्यमंत्री सहायता निधीला देणार एका दिवसाचं वेतन !

State Government Employees : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून मुख्यमंत्री सहायता निधीला एका दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय
Published on

Mumbai : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून मुख्यमंत्री सहायता निधीला एका दिवसाचे वेतन देणगी म्हणून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात पावसामुळे उद्‍भवलेल्या नैसर्गिक आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत म्हणून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून जून महिन्याच्या वेतनातून एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देणगी म्हणून उपलब्ध करून देण्याबाबतचा आदेश सरकारने काढला आहे.

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे अनेक शेतकऱ्यांसह अनेक सर्वसामान्य नागरिकांचे नुकसान झाले. त्यांच्या मदतीसाठी राज्य सरकार कसोशीने प्रयत्न करत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारी कर्मचारी मदतीसाठी पुढे आले असून मुख्यमंत्री सहायता निधीला एका दिवसाचे वेतन मदत म्हणून देणार आहेत.

State Government Employees
Congress News: मोठी बातमी! भाई जगतापांना अध्यक्षपदावरून हटवलं; वर्षा गायकवाड मुंबई काँग्रेसच्या नव्या अध्यक्षा

महासंघाशी संलग्न सर्व विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी देखील एक दिवसाचा पगार या मदतकार्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यास इच्छुक असून याबाबत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने पत्राव्दारे सरकारला कळवलं आहे.

State Government Employees
Congress News: काँग्रेस हायकमांडचा मोठा निर्णय; मुंबई, गुजरातसह पद्दुचेरीतही खांदेपालट

दरम्यान, नैसर्गिक आपत्तीला सामोरं जाण्यासाठी सहाय्य आणि मदत व पुनर्वसनाच्या कामाला काहिसा हातभार लागावा, आणि त्यामध्ये राज्यातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग असावा म्हणून आपल्या वेतनातील एका दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत देण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले होते.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com