AAP : आमदारकीचे स्वप्न पाहणाऱ्या आपच्या उमेदवाराला सहा महिन्याची शिक्षा

Gujarat AAP : अंकलेश्वर विधानपरिषदेतील आम आदमी पक्षाचे उमेदवार अंकुर पटेल यांना सहा महिन्याची शिक्षा सुनावली आहे.
Arvind Kejriwal
Arvind Kejriwal Sarkarnama
Published on
Updated on

Gujarat AAP : गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान गुरुवारी झाले. १९ जिल्ह्यांमधील ८९ जागांसाठी ६२.९२ टक्के मतदान झाले. सन २०१७ च्या तुलनेत (६८.३८%) ५.४६ % कमी असून गेल्या दहा वर्षांतीलही सर्वात कमी मतदान ठरले.तर दुसरीकडे आमदारकीचे स्वप्न पाहणाऱ्या आम आदमी पक्षाच्या उमेदवाराला न्यायालयाने सहा महिन्याची शिक्षा सुनावली आहे.

गुजरातच्या भरुच कोर्टाने अंकलेश्वर विधानपरिषदेतील आम आदमी पक्षाचे उमेदवार अंकुर पटेल यांना सहा महिन्याची शिक्षा सुनावली आहे. आपचे उमेदवार अंकुर पटेल यांना धनादेश न वटल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

अंकुर पटेल यांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये सलीम वाडिया नावाच्या व्यक्तीला ५ लाख आणि २ लाख रुपयांचा धनादेश दिला होता. यातील दोन लाख रुपयांचा चेक बाउंस झाला. याप्रकरणी पटेल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात होता. भरुच कोर्टाने पटेल यांना दोषी धरुन त्यांना सहा महिन्याची शिक्षा सुनावली आहे.

Arvind Kejriwal
Eknath Shinde : मोदींच्या 'या' निर्णयामुळे शिंदे सरकारच्या अडचणी वाढणार ; हिवाळी अधिवेशनात गदारोळ ?

सलीम वाडिया यांचे वकील बाबा सय्यद यांनी सांगितले की, वाडिया यांनी पटेल यांना ८ लाख रुपये दिले होते. ते त्यांच्या पैशांची मागणी करीत होते. पटेल यांनी त्यांनी ५ लाख व २ लाख रुपयांचे दोन चेक दिले होते. त्यातील दोन लाखांचा चेक बाउंस झाला आहे. अंकुर पटेल यांचे पेट्रोल पंप आहेत, तर दुसरीकडे सलीम वाडिया यांच्या जुनी वाहने खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. काही महिन्यापूर्वी दोघांमध्ये मैत्री झाली होती.

दुसरीकडे काल (गुरुवारी) वासंदा येथे काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. यामध्ये वासंदा येथील भाजपचे उमेदवार पियुष पटेल जखमी झाले. काँग्रेसकडून अनंत पटेल रिंगणात आहेत.वासंदा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याने मतदान केंद्रावर काही काळ तणाव होता. अनंत पटेल यांनी हा हल्ला केल्याचा आरोप केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com