Gujarat Election 2022 : 'हीच' रणनीती भाजपला गुजरात निवडणुकीत पोहचविणार शंभरीपार!

Gujarat Election 2022 : यंदाच्या गुजरात निवडणुकीत भाजपला 120 च्या आसपास जागा येतील
 Narendra Modi,Amit Shah
Narendra Modi,Amit Shah sarkarnama

Gujarat Election 2022 : निवडणूक आयोगाने केलेल्या घोषणेनंतर सुरु झालेला गुजरात विधानसभा निवडणुकीचा धुराळा सोमवारी शांत झाला आहे. गुजरातमधील दुसर्या व अखेरच्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. येत्या 8 डिसेंबरला मतमोजणी होणार असून त्यात जनकौल कुणाच्या पारड्यात आहे हे स्पष्ट होणार आहे. मात्र, मतदारांचा घसरलेला टक्का आणि आम आदमी पक्षाने उभं केलेलं आव्हान याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पण याचवेळी यंदाच्या गुजरात निवडणुकीत भाजपला 120 च्या आसपास जागा येतील असा आत्मविश्वास गुजरात निवडणुकीत प्रचाराची धुरा सांभाळणारे पुण्यातील भाजप आमदार सिध्दार्थ शिरोळे (Siddharth Shirole) यांनी व्यक्त केला आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीतील प्रचारकांमध्ये आमदार सिध्दार्थ शिरोळे यांचा समावेश होता. त्यांनी मतमोजणी आणि निकालाआधीच मोठं विधान केलं आहे.

 Narendra Modi,Amit Shah
Ajit Pawar : वंचित आघाडीसाठी तयार असल्यास मविआची भूमिका काय? अजित पवार म्हणाले...

शिरोळे म्हणाले, भाजपकडून मला तिसर्यांदा परराज्यातील निवडणुकीच्या प्रचाराची जबाबदारी देण्यात आली. यात आधी पश्चिम बंगाल, गोवा, आणि आता गुजरात विधानसभा निवडणुकीचा समावेश आहे. यावेळी गुजरात निवडणुकीत माझ्याकडे सुरतमधील मंगळूर मतदारसंघाची जबाबदारी होती. तिथे जवळपास 27 दिवस तळ ठोकून होतो. याकाळात खूपकाही शिकायला मिळालं. आणि मागील 25 ते 27 वर्षांपासून राज्यात भाजप सत्तेत असून देखील तिथे पक्ष संघटन किती खोलवर रुजलेलं आहे हे पाहायला दिसलं.

मी ज्या मतदारसंघात होतो, गणपत वसावा असं तेथील उमेदवाराचं नाव होतं. ते माजी मंत्री होते. पहिल्यापासूनच त्यांच्यासाठी अनुकूल वातावरण राहिलं. तिथे भाजपचा संघटनात्मक बेस खूपच चांगला होता. तसेच प्रचाराची फौज खूपच मोठी होती. पण माझ्याकडे जबाबदारी असलेल्या मतदारसंघात काँग्रेस आणि आपचा प्रचारही कुठे दिसला नाही. आणि तेच चित्र शेवटपर्यंत कायम राहिले.

 Narendra Modi,Amit Shah
Maharashtra-Karnataka Dispute : सीमावादात मोठी अपडेट; एकीकरण समिती मोदी,शहांना लिहिणार पत्र!

यंदाच्या गुजरात विधानसभा निवडणुकीत 2017 पेक्षा जास्त जागा भाजपच्या निवडून येतील. साधारण 120 च्या आसपास भाजप जागा जिंकेल असा विश्वास आहे. याचं कारण म्हणजे एकीकडे काँग्रेस आणि आपकडून ठराविक मतदारसंघ सोडले तर प्रचाराकडे केलेलं दुर्लक्ष तर दुसरीकडे भाजपने मोठ्या मतदारसंघासह अगदी लहानातल्या लहान मतदारसंघासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. तसेच नेहमीप्रमाणे त्यात मजबूत पक्षसंघटन, पंतप्रधान मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रचारासाठी उतरविलेली तगडी प्रचारकांची फौज,विकासकामांचा धडाका आणि केलेली विकासकामे सामान्य लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी लोकप्रतिनिधी,पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी घेतलेली अहोरात्र मेहनत ही रणनीती राबविण्यात आली. आणि तीच भाजपच्या विजयाचं कारण आहे.

गुजरातमधील शहरीसह ग्रामीण भागातील चकाचक रस्ते, अखंडित वीज, मुबलक पाणी, उत्तम शिक्षण यांसह मूलभूत सुविधांवर सरकार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी चांगलं काम केलं आहे. हे या प्रचारावेळी जवळून पाहायला मिळालं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com