Gujarat Election 2022 : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या (Gujarat Election 2022) पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरवात झाली आहे. गुजरातमध्ये भाजपा, काँग्रेस आणि आप अशी तिरंगी लढत पाहायला मिळत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले. (Gujarat Election 2022 voting live update)
सकाळी मतदानास सुरवात झाल्यानंतर एका ठिकाणी काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले, त्यामुळे राडा झाला. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने आता या ठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे. सकाळी शांततेत मतदान सुरु होते, मात्र नवसारी जिल्ह्यात या मतदानाला गालबोट लागले.
वासंदा येथे काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. यामध्ये वासंदा येथील भाजपचे उमेदवार पियुष पटेल जखमी झाले. काँग्रेसकडून अनंत पटेल रिंगणात आहेत.वासंदा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याने मतदान केंद्रावर काही काळ तणाव होता.
दक्षिण गुजरात आणि कच्छ-सौराष्ट्र भागांत 19 जिल्ह्यांतील 89 जागांसाठी दोन कोटींहून अधिक मतदार 788 उमेदवारांना मतदान करणार आहेत. यामध्ये सौराष्ट्रातील 48, कच्छमधील 6 आणि दक्षिण गुजरातमधील 35 जागांचा समावेश आहे. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीचा (आप) देखील या निवडणुकीच्या रिंगणात प्रवेश झाल्याने येथे तिंरगी लढत होत आहे. गुजरातचा मिनी आफ्रिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जांबूर गावात लोक पहिल्यांदाच मतदान करणार आहेत.
राजकोट पश्चिम येथेही पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2002 मध्ये राजकोट पश्चिममधून निवडणूक लढवली होती. त्यानंतर मोदी 14 हजार मतांनी विजयी झाले. 2002 नंतर भाजपकडून वजुभाईवाला यांनी दोनदा आणि भाजपकडून विजय रुपाणी यांनी एकदा या जागेवरून निवडणूक जिंकली आहे. लोहाणा, ब्राह्मण, पाटीदार आणि जैन बहुल या जागेवर 2022 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने डॉ. दर्शिता शहा यांना उमेदवारी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.