मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 50 आमदारांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला आहे. या मुद्द्यावर शिवसेनेने आज राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक आहे. तर दुसरीकडे गुवाहाटी येथे शिंदे गट नवी रणनीती आखण्यात व्यग्र आहेत. हा सगळ्या घडामोडीत गुवाहाटीत आता राष्ट्रवादी कॉग्रेसने एन्ट्री केली आहे. (Eknath Shinde news update)
एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र गट स्थापन केला आहे. सध्या या आमदारांचे वास्तव्य गुवाहाटीतील रॅडीसन्स ब्ल्यू या हॉटेलमध्ये आहे. राष्ट्रवादी काँग्रेसही यात सक्रिय होताना दिसत आहे.
शिंदेंसह त्यांच्या गटाचे वास्तव्य असलेल्या गुवाहाटीतील रॅडीसन्स ब्ल्यू या हॉटेलबाहेर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन पदाधिकारी टेहळणी करीत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे आता याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. राष्ट्रवादीचे हे दोन पदाधिकारी कोण ? असा प्रश्न विचारला जात आहे. विविध चर्चांना उधाण आलं आहे.
कुशल करंजावणे आणि सुहास उभे असे या पदधिकाऱ्यांची नावे आहेत. करंजावणे हे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सचिव, तर उभे हे राज्य समन्वयक आहेत. हे दोघेही शुक्रवारी गुवाहाटीतील रॅडीसन्स ब्ल्यू दिसले.
शिंदे गटाच्या प्रवक्तेपदी भरत गोगावले आणि बच्चू कडू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिंदे गटाकडून सत्ता स्थापनेसाठी हालचाली जोरात सुरु आहेत. शिंदे गटानं चर्चेसाठी एक शिष्टमंडळ तयार केलं आहे. या शिष्टमंडळात शंभूराज देसाई, दादा भुसे, भरत गोगावले, बच्चु कडू यांचा समावेश आहे. शिंदे गटाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी शिष्टमंडळात प्रवक्ते देखील असणार आहेत. आज ते महाविकास आघाडीचा पाठिंबा काढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.