Har Ghar Tiranga : तिरंगा फडकवताना 'या' ध्वजसंहितेचे पालन करा ; घर पोहोच मिळवा राष्ट्रध्वज

Har Ghar Tiranga : राष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला फडकवताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही, यासाठी काही नियम करण्यात आले आहेत.
 Har Ghar Tiranga news
Har Ghar Tiranga newssarkarnama

पुणे : भारतीय स्वातंत्र्याला यंदा 75 वर्षे पूर्ण होत आहे. यंदाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर 13 ते 15 ऑगस्ट 2022 दरम्यान ‘हर घर तिरंगा’ (Har Ghar Tiranga) हा उपक्रम राबविण्यात येत आहे. (Har Ghar Tiranga news update)

देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय सण व अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मानपूर्वक फडकवला जातो. राष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला फडकावित असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही, यासाठी काही नियम करण्यात आले आहेत.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने भारतीय राष्ट्रध्वज संहिता तयार करण्यात आली आहे. ध्वज संहितेबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

राष्ट्रध्वज फडकविताना प्रत्येक नागरिकाने कटाक्षाने राष्ट्रध्वजाचा सन्मान करत ध्वजसंहितेचे पालन करावे, असे आवाहन पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे. याबाबत काही सूचना केल्या आहेत.

काय करावे

  • घरोघरी तिरंगा या उपक्रमांतर्गत राष्ट्रध्वज फडकविताना हाताने कातलेल्या, विणलेल्या किंवा मशीनद्वारे सुत, पॉलिस्टर, सिल्क, खादी, लोकरपासून तयार केलेला वापरावा.

  • राष्ट्रध्वज हा 3:2 या प्रमाणात असावा. केशरी रंग वरच्या बाजुने आणि हिरवा रंग जमिनीच्या बाजुने राहील याप्रमाणे फडकवावा.

  • राष्ट्रध्वज उतरवतांना सावधतेने व सन्मानाने उतरवून सुरक्षित ठिकाणी ठेवावा. राष्ट्रध्वज कोणत्याही पद्धतीने फाटणार नाही याची काळजी घ्यावी.

काय टाळावे

  • राष्ट्रध्वज फडकवताना पुढील गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात.

  • प्लास्टिक किंवा कागदी ध्वज वापरु नये. कोणत्याही सजावटी वस्तू लावू नयेत.

  • राष्ट्रध्वज फडकवितेवेळी फुलांच्या पाकळ्या ठेऊ नयेत.

  • राष्ट्रध्वजावर कोणत्याही प्रकारचे अक्षर किंवा चिन्ह काढू नये.

  • राष्ट्रध्वज फाटलेला, मळलेला अथवा चुरगळलेला लावण्यात येऊ नये.

  • एकाच वेळी इतर ध्वजासोबत एकाच काठीवर राष्ट्रध्वज फडकवू नये.

  • तोरण, गुच्छ अथवा पताका म्हणून अन्य कोणत्याही प्रकारचे शोभेसाठी राष्ट्रध्वजाचा उपयोग करु नये.

 Har Ghar Tiranga news
CBI : ममतांना आणखी मोठा धक्का ; तृणमूल काँग्रेस नेते अनुब्रत मंडलांना अटक

भारत यंदा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'हर घर तिरंगा' मोहीम सुरू केली. त्यांनी 13 ऑगस्टे ते 15 ऑगस्ट पर्यंत आपल्या घरावर राष्ट्रध्वज तिरंगा फडकवण्याचं आवाहन केलं आहे. प्रत्येक व्यक्तीला राष्ट्रध्वज उपलब्ध व्हावा यासाठी पोस्टातून तो खरेदी करता येणार आहे. पोस्ट ऑफीसमध्ये जावून रहिवाशांना प्रति ध्वज 25 रुपयांमध्ये मिळणार आहे. भारतीय राष्ट्रध्वज मिळविण्यासाठी स्थानिकांना सरकारी टपाल यंत्रणा फक्त 25 रुपयांमध्ये भारतीय ध्वज वितरण करत आहे.

राष्ट्रध्वज कसा कराल ऑर्डर

1. ई-पोस्टऑफिस (https://www.epostoffice.gov.in/) पोर्टलला भेट द्या आणि नवीन युजर म्हणून नोंदणी करा.

2. लॉगिन केल्यानंतर राष्ट्रीय ध्वजचा फोटो दिसेल त्यावर क्लिक करा.

3. Buy now वर क्लिक करुन पेमेंट करा.

25 रुपयांशिवाय यावर कोणतेही शिपिंग शुल्क आकारले जाणार नाही. भारतीय ध्वजाचा आकार 20 इंच बाय 30 इंच आहे. तिरंग्याची किंमत 25 रुपये प्रति नग आहे. भारतीय ध्वजावर जीएसटी नाही. ग्राहकांना त्यांची ऑर्डर रद्द करता येणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com