Harshvardhan Sapkal: भाजपने साडी नेसवलेल्या मामांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी घेतलं खांद्यावर; डोंबिवलीत काय घडलं?

Harshvardhan Sapkal Takes Mama Pagare on Shoulders: आपल्या निष्ठावान, सच्च्या कार्यकर्ता असलेल्या मामा यांना उचलल्यानंतर त्यांचे दोन्ही हात उंचावून कॉग्रेस यांच्या पाठीशी ठामपणे आहे हे दाखविण्याचा प्रयत्न प्रदेशाध्यक्ष सकपाळ यांनी केला.
Harshvardhan Sapkal
Harshvardhan SapkalSarkarnama
Published on
Updated on

डोंबिवली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक वादग्रस्त प्रतिमा समाज माध्यमातून व्हायरल केल्याने भाजपा पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी मामा पगारे यांना साडी नेसवत सत्कार केला होता. तर ज्येष्ठ व्यक्तीला अशी वागणूक दिल्याने याविरोधात गुन्हा दाखल व्हावा यासाठी काँग्रेस मागणी करत आहे. शनिवारी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ कल्याणमध्ये आले. त्यांनी मामा पगारे यांना खांद्यावर घेतले, त्यांचा सत्कार केला.

भाषणात मामा यांनी पुन्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात वादग्रस्त विधान केले. यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी भाजपा पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यामुळे पुन्हा एकदा भाजपा आणि काँग्रेसमध्ये वाद पेटला आहे.

डोंबिवलीतील काँग्रेसचे निष्ठावान आणि ज्येष्ठ कार्यकर्ते मामा पगारे यांनी समाज माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक वादग्रस्त पोस्ट व्हायरल केली होती. त्यावरून भाजपाचे जिल्हाध्यक्ष नंदू परब, उपजिल्हाध्यक्ष संदीप माळी यांसह काही पदाधिकाऱ्यांनी पगारे यांना चक्क साडी नेसवत त्यांचा सत्कार केला होता.

पोलिसांना याप्रकरणी कारवाई करण्याचे निवेदन दिले होते. तर काँग्रेसचे पगारे यांनी याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल न झाल्याने त्याचा निषेध करण्यासाठी शनिवारी काॉग्रेसचे प्रदेराध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली कल्याण येथे पोलीस उपायुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

कार्यक्रमस्थळी प्रदेशाध्यक्ष सकपाळ आल्यानंतर व्यासपीठाजवळ त्यांनी मामा यांना अलगद खांद्यावर उचलून घेतले. आपल्या निष्ठावान, सच्च्या कार्यकर्ता असलेल्या मामा यांना उचलल्यानंतर त्यांचे दोन्ही हात उंचावून कॉग्रेस यांच्या पाठीशी ठामपणे आहे हे दाखविण्याचा प्रयत्न प्रदेशाध्यक्ष सकपाळ यांनी केला.

प्रदेशाध्यक्षांची ही कृती पाहून सर्वच कॉग्रेस नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आवाक झाले. यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, नवीन सिंग यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. ब्लेझर गांधी टोपी घालून, भगवान गौतम बुद्ध यांची प्रतिमा आणि संविधानाची प्रत देऊन सत्कार केला.

मामा पगारे यांच्या पाठीशी आपण सारे आहोत. त्यांच्यावरील अन्याय काँग्रेस पक्ष सहन करणार नाही. जोपर्यत पगारे यांच्या प्रकरणात भाजप पदाथिकाऱ्यांवर अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल होत नाही तोपर्यत कॉग्रेस गप्प बसणार नाही, असा इशारा यावेळी प्रदेशाध्यक्ष सकपाळ यांनी दिला.

निष्ठावान कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी आणि त्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी प्रदेशाध्यक्ष स्वतः कल्याणमध्ये आल्याने कॉग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यामध्ये उत्साह संचारला होता. भाजप निषेधाच्या घोषणा यावेळी कॉग्रेस कार्यकर्त्यांकडून देण्यात येत होत्या.

आपल्या भाषणात मामा पगारे यांनी भाजपा विरोधात तसेच संघाच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केले. आझादी के जंग मे जो मर्द थे वो जंग गये, जो ना मर्द थे वो.xxx गये... असे म्हटले. यावरून आता भाजपा काँग्रेसमध्ये वाद पेटला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com