मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (nawab malik) यांच्याविरोधात ईडीने (ed) दाखल केलेल्या आरोपत्रात मुंबईतील गोवावाला कंपाऊड संदर्भात अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. मलिक यांनी याबाबत ईडीच्या चौकशीत काही खुलासे केले आहेत. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिचा बॉडीगार्ड सलीम पटेल (Salim Patel) बाबतही मलिक यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
सलीम पटेल हा हसीना पारकरचा अत्यंत जवळचा निकटवर्तीय होता, हसीना पारकरने केलेल्या जवळपास सर्व व्यवहाराची त्याला कल्पना असायची, गोवावाला कम्पोउंड संदर्भात झालेल्या व्यवहारात सलीम पटेलला नवाब मलिक यांच्याकडून 15 लाख मिळले होते. नवाब मलिक यांचा भाऊ अस्लम मलिक यांचीही गोवावाला कंपाउंडच्या संबंधित व्यवहारात सहभाग असल्याचे समोर आले आहे.
सध्या मनी लॅान्ड्रिग प्रकरणी नवाब मलिक अटकेत आहेत. त्यांनी ईडीला सांगितले की, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिचा बॉडीगार्ड सलीम पटेलला मी 2002 सालापासून मी ओळखत होतो, तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होता आणि आणि राष्ट्रवादीचे तत्कालीन मुंबई अध्यक्ष चंद्रकांत त्रिपाठी यांच्या नेतृत्वात तो काम करत होता," "गोवावाला कंपाऊड संदर्भात झालेल्या व्यवहाराच्या बऱ्याच गोष्टी आपणास माहिती नव्हत्या," असे मलिक यांनी जबाबात सांगितले आहे.
नवाब मलिकांच्या प्रकरणात ईडी कडून त्यांच्या पत्नीला 5 वेळेस आणि मुलाला 2 वेळेस समन्स पाठवण्यात आला होता. पण ते चौकशीसाठी आले नसल्याच चार्जशीटमध्ये सांगण्यात आले आहे. नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम ( Daud Ibrahim )यांच्यासोबत असलेल्या संबधांबाबत आपल्याकडे भक्कम पुरावे असल्याचे ईडीनं मंगळवारी न्यायालयात सांगितले.
मलिक यांचे दोन मुले, आणि पत्नीला चौकशीसाठी ईडीनं बोलविलं होते. पण ते उपस्थित राहिले नाहीत, त्यांच्या पत्नीला दोन वेळा, तर त्याचा मुलगा फराज मलिक यांना पाच वेळा समन्स पाठविले होते, तरीही ते उपस्थित राहिले नाहीत, ते मनमानी करीत असल्याचा आरोप ईडीनं आरोपपत्रात केला आहे.
दाऊद इब्राहिम याचा भाचा अलीशाह पारकर ( Alishah Parkar ) याचा ईडीने काही दिवसांपूर्वी मनी लाँन्ड्रिग प्रकरणात जबाब नोंदवला होता. त्यावेळी त्याने ईडीला माहिती दिली. त्यामुळे वाब मलिक यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. आई हसीना पारकर हिने यातील हा भाग नवाब मलिक यांना विकल्याचा दावा अलीशाह पारकरने ईडीला दिलेल्या जबाबात म्हटले आहे. यामुळे मलिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.