Vishwas Nangre Patil's fake Account: तुम्हालाही विश्वास नांगरे पाटील यांचा मेसेज आलाय का? मग ही बातमी वाचाच...

Cyber Crime | राज्यासह देशभरात सायबर गुन्ह्यांच्या अनेक घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.
Vishwas Nangre Patil's fake Account:
Vishwas Nangre Patil's fake Account:Sarkarnama

Vishwas Nangre Patil's fake Account: आयपीएस अधिकारी व लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक विश्वास नांगरे पाटील (IPS Vishwas Nangre Patil) यांचे बनावट फेसबुक अकाऊंट बनवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विश्वास नांगरे पाटील यांनी स्वत: याबाबतची माहिती फेसबुकवर पोस्ट केली आहे. संबधित आरोपी हा विश्वास नांगरे पाटील असल्याचे भासवून लोकांशी चॅट करत असल्याचही त्यांनी सांगितलं आहे. या प्रकरणी सायबर पोलिस अधिक तपास करत आहेत.

Vishwas Nangre Patil's fake Account:
Suhas Kande News : आमदार सुहास कांदे यांच्याकडे मागितली ५ लाखांची खंडणी?

या संबंधी विश्वास नांगरे पाटील यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरुन पोस्ट शेअर करत या बनावट अकाऊंटची पोलखोल केली आहे. नमस्कार मित्रांनो, काही घोटाळेबाजांनी माझ्या नावावर बनावट खाते तयार केले आहे. ते माझ्या काही संपर्कांना खाली दिलेले संदेश पाठवत आहेत. मी तातडीने कायदेशीर कारवाई करत आहे. परंतु कृपया प्रतिसाद देऊ नका किंवा कोणत्याही प्रकारची माहिती सामायिक करू नका. कारण हा फसवणूक करण्याचा प्रयत्न आहे! धन्यवाद...'' असं लिहीत त्यांनी त्यांच्या चाहत्यांना सतर्क केलं आहे. (Vishwas Nangre Patil's fake Account news)

दरम्यान,राज्यासह देशभरात सायबर गुन्ह्यांच्या (Cyber Crime) अनेक घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.अशा सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांचे एक पथक सातत्याने काम करत आहे. सोशल मीडिया अकाऊंट्सचा गैरवापर करुन दिवसेंदिवस ऑनलाइन गुन्ह्याच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे.अलीकडच्या काळात राज्यातील मोठ्या प्रतिष्ठीत व्यक्ती, कलाकार, उद्योजकांच्या नावाने बनावट सोशल मिडीया अकाऊंट सुरु करुन लोकांना लुबाडण्याचेही प्रकार उघडकीस येऊ लागले आहे. आता या सायबर गुन्हेगारांनी थेट विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil) यांच्च नावाने बनावट अकाऊंट सुरु केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com