Chhota Rajan News
Chhota Rajan NewsSarkarnama

Chhota Rajan News : उच्च न्यायालयाचा छोटा राजनला झटका; 'या' वेबस्टोरीवरील स्थगिती रोखण्यास दिला नकार

Mumbai High Court : 'हा' आरोप करत छोटा राजनने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
Published on

Chhota Rajan Seeks Stay on Web Series Scoop: अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनने नेटफ्लिक्स या ओटीटी फ्लॅटफॉर्मवर शुक्रवारी दि.२ जून) प्रदर्शित होणाऱ्या एका वेबस्टोरी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयानं छोटा राजनला दणका देतानाच ही मागणी फेटाळली आहे. तसेच संबंधित वेबस्टोरीचं प्रदर्शन रोखण्यासही नकार दिला आहे.

हंसल मेहता दिग्दर्शित नेटफ्लिक्सवर 'स्कूप' ही मालिका प्रदर्शित होत आहे. ही मालिका ज्येष्ठ पत्रकार ज्योतिर्मय डे उर्फ जे. डे. यांच्या हत्येच्या खटल्यातून निर्दोष सुटलेली पत्रकार जिग्ना व्होरा यांच्या कथेवर आधारित आहे. जे. डे. यांनी अंडरवर्ल्डबद्दल विस्तृतपणे लिखाण केले होते. मात्र,या वेबस्टोरीमधून व्यक्तिमत्व हक्कांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत छोटा राजनने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावेळी त्याने या वेबस्टोरीच्या प्रदर्शनावर स्थगिती आणि ट्रेलर काढून टाकण्याची मागणी केली आहे.

Chhota Rajan News
Maval Loksabha Election Politics: महाविकास आघाडीत मावळ ठरणार कळीचा मुद्दा : राष्ट्रवादीच्या मागणीने शिवसेनेत नाराजी

छोटा राजनच्या याचिकेवर शुक्रवारी(दि.२ जून) सुट्टीतील खंडपीठात सुनावणी होण्याची शक्यता आहे.त्यावर शुक्रवारी दुपारी (दि.२) सुनावणी झाली. यावेळी न्यायालयानं छोटा राजनला मुंबई हायकोर्टाचा दिलासा नाही. जे डे हत्या प्रकरणावर निर्मित वेब सिरीज रिलीज थांबविण्याबाबत कोर्टाचा नकार दिला आहे. मात्र, याबाबत संबंधित फिल्म निर्माता आणि इतर सर्वाना कोर्टाची नोटीस दिली आहे. आपलं उत्तर कोर्टात दाखल करण्याचा संबंधित पक्षकारांना कोर्टाने निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 जून रोजी होणार आहे.

राजनचा आरोप काय?

छोटा राजनने (Choota Rajan)त्याच्या व्यक्तिमत्व हक्कांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. तो म्हणाला, "निर्मात्यांनी मालिका प्रदर्शित करू नये म्हणून त्यांना वारंवरा सूचित केले होते. मात्र कायदेशीर सूचनेचे पालन केले जात नसल्यानेच त्यांच्याविरोधात न्यायालयात जावे लागले. दरम्यान, जे. डे. हत्येप्रकरणी त्याला आणि इतरांना दोषी ठरवणाऱ्या 'सीबीआय' च्या विशेष न्यायालयाच्या आदेशाला आपण आव्हान दिले होते. ती याचिका उच्च न्यायालयात (High Court) प्रलंबित आहे."

Chhota Rajan News
Nana Patole On Adani - Pawar Meets : '' उद्या अदानी पवारांच्या घरी राहायला गेले तरी...''; पटोलेंची खोचक प्रतिकिया

राजन याने याचिकेत म्हटले आहे की, ही मालिका सीबीआय (CBI) न्यायालयाच्या २ मे २०१८ रोजी दोषी ठरवण्याच्या आदेशाविरुद्धच्या उच्च न्यायालयाच्या याचिकेवर परिणाम करणारी आहे. त्यामुळे राजन याने मालिकेच्या ट्रेलर काढून टाकण्ची मागणी केली. तसेच कोणत्याही माध्यमाने किंवा कोणत्याही माध्यमाद्वारे त्याचे नाव, प्रतिमा आणि व्यक्तिमत्त्वाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे वापर करण्याविरूद्ध कायमस्वरूपी मनाई करण्याची मागणी केली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com