Devendra Fadnavis On Ambedkar : “संभाजी महाराजांच्या हत्येच्या कटात हिंदूं भटजीही..,” ; आंबेडकरांच्या विधानावर फडणवीस म्हणाले..

Devendra Fadnavis On Prakash Ambedkar : "कुणीही इतिहास बदलण्याचा प्रयत्न करू नये..."
Devendra Fadnavis On Prakash Ambedka
Devendra Fadnavis On Prakash AmbedkaSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसेवा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी छत्रपती संभाजी महाराजांची हत्येबाबत मोठे विधान केले होते. संभाजी महाराज हत्येच्या कटामध्ये त्यावेळी मुघल बादशहांसोबतच हिंदू भटजींचाही सहभाग होता, असं वक्तव्य त्यांनी केल्यामुळे यावर मोठे वादंग निर्माण झाले. आंबेडकरांनी यावेळी या विधानाला पुष्टी देणारा, ऐतिहासिक दाखलाही असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आंबेडकरांच्या या विधानावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (Latest Marathi News)

Devendra Fadnavis On Prakash Ambedka
Shivsena (UBT) News : ठाकरे गटाची अडचण वाढणार; चव्हाणनंतर आता 'यांची' चौकशी होणार

प्रकाश आंबेडकर हे नव्या इतिहासाचं लेखन करत असतात. आंबेडकर हे औरंगजेबाच्या कबरीवर गेले होते. त्यावेळी तिथे त्यांनी काय विधान केलं, ते सर्वांनी ऐकलं आहे, असे फडणवीस म्हणाले. "हिंदू असोत वा इतर कुणीही असो, हे सर्वांना ज्ञात आहे की, औरंगजेबानेच छत्रपती संभाजी महाराजांवर अनन्वित अत्याचार केले होते.” अशीही प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना फडणवीसांनी दिली.

कुणीही इतिहास बदलण्याचा प्रयत्न करू नये -

“औरंगाजेबाने संभाजी महाराजांवर अनन्वित अत्याचार केला. हे अत्याचार आणि छळ करण्याचं कारण होतं, म्हणजे संभाजी महाराज देव, देश आणि धर्माची लढाई लढत होते. मात्र महाराजांना ती देव - धर्माची लढाई सोडून धर्मांतर करा, आमच्या धर्मात या असं सांगितलं जात होतं. पण छत्रपतींच्या शिवरायांच्या छाव्याने धर्मासाठी हे अत्याचार सहन केले. पण औरंगजेबाची मागणी मान्य केली नाही. यामुळेच छत्रपती संभाजी महाराजांचा अनन्वित अत्याचार करून औरंगजेबाने त्यांना यातना देत मारलं आहे, हे सर्वांना माहीत आहे. हा इतिहास बदलण्याचा प्रयत्न कुणीही करू नये,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis On Prakash Ambedka
Eknath Shinde Big Decision : मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांकडून आषाढी वारीतील समन्वय साधण्यासाठी 'या' दोन मंत्र्यावर विशेष जबाबदारी

प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले होते ?

ऐतिहासिक दाखला देत संभाजी महाराजांच्या हत्येसंदर्भात प्रकाश आंबेडकर म्हणाले, "देशात सध्या इतिहासातील जुन्या राजाचं उदाहरणे देवून, समाजा-समाजात तेढ निर्माण केले जात आहे. मात्र वस्तुस्थिती तशी अजिबात नाही. त्यांच्या (संभाजी महाराज) हत्येच्या कटामध्ये मुघल बादशहांबरोबरच भारतीय हिंदू भटजीही होतेच. महाराजांच्या हत्येच्या कटात हिंदू भटजींची सहभाग होता, यावर इतिहासावर सविस्तर लिहायला हवं, जेणेकरूण देशात कुणी जयचंद निर्माण होणार नाहीत, देशाचं स्वातंत्र्य जाणार नाही."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com