

औरंगजेबाचे पोस्टर आणि स्टेटस ठेवल्याचा प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी या मुद्यावरून मुस्लिमांनी बॅकफूटवर जावू नये, अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर शनिवारी (१७ जून) त्यांनी अचानक खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली. यावरुन राजकीय प्रतिक्रिया उमटत असतानाच हिंदू महासभेचे आनंद दवे यांनी प्रकाश आंबेडकर यांना अटक करण्याची मागणी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास देणाऱ्या आणि संभाजी महाराजांची हत्या करणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीवर डोक टेकून प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राज्यातील लाखो शिवभक्तांना दुखावलं आहे. नव्हे त्यांनी शिवभक्तांच्या शिवभक्तीला आव्हानच दिलं आहे, राज्यातील वातावरण बिघडण्याआधी, शिवभक्त चिडण्याआधीच सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी. त्यांच्यावर कडक कलम लावून त्यांना अटक सुद्धा करावी अशी आमची भावना आहे. आमची भूमिका हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे यांनी मांडली आहे.
आज प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या (Aurangajeb) कबरीवर माथा टेकवण्याचं पाप केलं. हा महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही. कारण हा प्रश्न जात धर्म पक्षाच्या पलीकडे आहे, ज्या औरंगजेबाने आपल्याच भावाचा खून केला. हिंदू- माता भगिनींवर अत्याचार केले. अशा अनाचारी,दुराचारी, अत्याचारी औरंगजेबाचे दर्शन घेऊन तुम्ही महाराष्ट्राला फसवण्याचं काम करत असाल तर हा महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही, अशा शब्दांत भाजपचे (BJP) खासदार उन्मेश पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर निशाणा साधला आहे.
दरम्यान, नगर, कोल्हापूरमध्ये औरंगजेबाचे पोस्टर झळकल्यानंतर राज्याच्या अनेक भागात औरंगजेबाचे स्टेटस ठेवण्यावरून मोठा वाद निर्माण झाला. (Aurangabad) कोल्हापूरात दंगल होवून हे शहर दोन दिवस धुमसत होते. राज्यात औरंगजेबाचे उद्दातीकरण कदापी खपवून घेतले जाणार नाही, अ शी भूमिका घेत राज्य सरकारने पोस्टर झळकावणाऱ्या आणि स्टेटस ठेवणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करत कठोर कारवाईची भूमिका घेतली होती.
वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या मुद्यावरून मुस्लिमांनी बॅकफुटवर जाण्याची गरज नसल्याचे मत व्यक्त केले होते. औरंगजेब कसा राजा होता? याबद्दल देखील त्यांनी आपली मते जाहीरपणे मांडली होती. त्यानंतर आता थेट औरंगजेबाच्या कबरीला भेट देत प्रकाश आंबेडकरांनी सगळ्याच राजकीय पक्षांना धक्का दिला आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.